कारले, दुधी भोपळा, दोडका आणि पडवळ या वेलींना आधार दिला असता त्यांची वाढ चांगली होते. नवीन फुटीला सतत चांगला वाव राहतो, फळधारणा चांगली होते.
1) ताटी पद्धतीमध्ये 6 फूट 3 फुटांवर वेलवर्गीय भाज्यांची लागवड करतात. यासाठी रिजरच्या साह्याने सहा फूट अंतरावर सरी पाडावी. प्रत्येक 25 फूट अंतरावर आडवे पाट तयार करावेत. सऱ्यांच्या लांबीच्या दोन्ही टोकांना दहा फूट उंचीचे व चार इंच जाडीचे डांब शेताच्या बाहेरच्या बाजूला झुकतील या पद्धतीने दोन फूट जमिनीत गाडावेत. त्यांना दोन्ही बाजूंनी दहा गेजच्या तारेने ताण द्यावा. नंतर प्रत्येक आठ ते दहा फुटांवर आठ फूट उंचीचे, दीड इंच जाडीचे बांबू, अडीच इंच जाडीच्या लाकडी बल्ल्या जमिनीत गाडून उभ्या कराव्यात.
2) लावलेल्या वेलींमध्ये उभे केलेले बांबू किंवा डांब आणि कडेचे लाकडी डांब एका सरळ रेषेत येतील याची काळजी घ्यावी. नंतर 16 गेज जाडीची तार जमिनीपासून दोन फूट उंचीवर, दुसरी तार जमिनीपासून सहा फूट उंचीवर ओढावी. त्यानंतर वेलींची दोन फूट उंचीवर बगलफूट व ताणवे काढून वेल सुतळीच्या साह्याने तारेवर चढवावेत.
3) बांबू आणि तारांऐवजी शेवरी किंवा इतर लाकडांचा वापर केल्यास खर्च कमी येऊ शकेल; परंतु ते साहित्य एका हंगामासाठीच उपयोगी पडेल. बांबू आणि तार तीन हंगामांपर्यंत वापरता येतात. त्या दृष्टीने विचार केला तर बांबू आणि तारा यांची ताटी स्वस्त पडेल.
1) फळे जमिनीपासून पाच ते सहा फूट उंचावर वाढतात, त्यामुळे पाने आणि फळे यांचा जमिनीशी संपर्क न आल्यामुळे ओलावा लागून ते सडत नाहीत, कीड आणि रोगांचे प्रमाण कमी राहते.
2) फळे लोंबकळती राहिल्यामुळे त्यांची वाढ सरळ होते आणि सूर्यप्रकाश सारखा मिळाल्यामुळे फळांचा रंग सारखा आणि चांगला राहतो.
3) फळांची तोडणी, कीडनाशकांची फवारणी करणे सोपे होते.
4) या पद्धतीने ट्रॅक्टरच्या किंवा बैलांच्या साह्याने आंतरमशागत करून उत्पादन खर्च कमी करता येतो.
5) वेल मंडपावर पोचेपर्यंत दीड ते दोन महिने कालावधी जातो, त्यामुळे या पिकांमध्ये पालेभाज्यांसारखी मिश्रपिके घेता येतात.
संपर्क - 02426 - 243342
अखिल भारतीय भाजीपाला सुधार योजना, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.
----------------------------------------------------------------------------------------------------------
स्त्रोत: अॅग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
अळूच्या लागवडीसाठी भरपूर सेंद्रिय पदार्थ असणारी, म...
मनीषा व देवनाथ जाधव या दांपत्याने तुती लागवड आणि र...
तूर -तुरीचे घरचे बियाणे असल्यास पेरण्यापूर्वी उगवण...
सध्याच्या काळात मीठा बहराच्या अंजीर फळांच्या वाढीक...