मेथी लागवडीसाठी मध्यम काळी, पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. लागवडीसाठी पुसा अर्ली बंचिंग, कसुरी या जाती निवडाव्यात. लागवड सप्टेंबर आणि फेब्रुवारी या कालावधीत करावी. लागवड तीन मीटर बाय दोन मीटरच्या सपाट वाफ्यामध्ये करावी. दोन ओळींमध्ये 15 सें.मी. अंतर ठेवावे. हेक्टरी 30 किलो बियाणे लागते. लागवडीपूर्वी बीजप्रक्रिया करावी.
अळू लागवडीसाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी. कोकण हरितपर्णी जातीची लागवड करावी. लागवड जून किंवा सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यांत करावी. लागवड सरी-वरंबे पद्धतीने 90 सें.मी बाय 30 सें.मी. अंतराने करावी. पिकाला मातीपरीक्षण अहवालानुसार रासायनिक खतांची मात्रा द्यावी. पानांचा उपयोग करायचा असल्यास दोन ते अडीच महिन्यांनंतर तोडणी करावी. अशी तोडणी नऊ महिन्यांपर्यंत करता येते. कंदांचा उपयोग करायचा असल्यास सहा महिन्यांमध्ये कंद तयार होतात.
संपर्क -
02426 - 243861
कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र,
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
उष्ण, कोरड्या, कमी पाऊस पडणाऱ्या प्रदेशात गोखरू ही...
पुणे येथील राजलक्ष्मी भोसले यांनी आपल्या 35 गुंठे ...
कमी धारणक्षेत्रामध्ये किफायतशीर शेती होऊ शकत नाही,...
अळूच्या लागवडीसाठी भरपूर सेंद्रिय पदार्थ असणारी, म...