दुधी भोपळा आणि काकडी लागवड
काकडी लागवड
- काकडी लागवड जून-जुलै आणि जानेवारी- फेब्रुवारी महिन्यांत करावी.
- जमिनीची योग्य मशागत करून शेणखत मिसळून द्यावे.
- लागवडीपूर्वी माती परीक्षणानुसार 50 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश द्यावे, अर्धे नत्र (50 किलो) लागवडीनंतर दोन समान हप्त्यांमध्ये विभागून द्यावे.
- लागवडीसाठी हिमांगी, फुले शुभांगी या जातींची निवड करावी.
- एक हेक्टर लागवडीसाठी दीड किलो बियाणे लागते.
- लागवडीपूर्वी शिफारशीत बुरशीनाशकाची लागवड 1 मीटर x 0.5 मीटर अंतराने करावी.
- या पिकावर रस शोषणारी कीड, फळमाशी या किडींचा प्रादुर्भाव होतो. तसेच केवडा व भुरी रोगांचा प्रादुर्भाव होतो. हे लक्षात घेऊन एकात्मिक पद्धतीने कीड, रोगनियंत्रण करावे.
दुधी भोपळा लागवड
- दुधी भोपळ्याच्या लागवडीसाठी मध्यम काळी, पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन निवडावी.
- जमिनीची योग्य मशागत करून शेणखत मिसळून द्यावे. लागवड जून-जुलै आणि जानेवारी- फेब्रुवारी महिन्यांत करावी.
- मंडप पद्धतीने 3 मीटर x 1 मीटर अंतराने लागवड करावी.
- पारंपरिक पद्धतीने लागवड करायची झाल्यास 5 मीटर x 1 मीटर अंतराने लागवड करावी. लागवडीपूर्वी माती परीक्षणानुसार 50 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश द्यावे.
- लागवडीनंतर एक महिन्याने 50 किलो नत्र द्यावे.
- प्रति हेक्टरी 2.5 किलो बियाणे लागते. लागवडीसाठी सम्राट ही जात निवडावी.
- या पिकावर केवडा, काळा करपा, पानावरील ठिपके हे रोग दिसून येतात.
- तसेच नागअळी, फळमाशीचा प्रादुर्भाव दिसून येतो.
- हे लक्षात घेऊन एकात्मिक पद्धतीने कीड, रोगनियंत्रण करावे.
संपर्क - 02426-243242
भाजीपाला सुधार योजना, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या
तार्यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.
© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.