कारली हे वेलवर्गीय पीक असल्याने वेलींना आधार दिला असता त्यांची वाढ चांगली होते. नवीन फुटीला सतत चांगला वाव राहतो आणि त्यामुळे फळधारणा चांगली होते. दर्जेदार आणि प्रमाणात उत्पादन मिळण्याकरिता वेलीला मंडप किंवा तारेच्या ताटीच्या आधाराने वाढवणे फायदेशीर दिसून आले आहे. वेलवर्गीय भाज्या मंडप, ताटी आधाराशिवाय चांगल्या येत नाहीत. जमिनीवर लागवड केली असता काही मर्यादित फुटवे आल्यानंतर नवीन फुटवे येत नाहीत आणि वेली केवळ एकदाच फळे देतात. मंडपावर वेली सहा ते सात महिने चांगल्या राहतात, तर जमिनीवर केवळ तीन ते चार महिनेच चांगल्या राहतात, त्यामुळे लागवडीसाठी मंडप किंवा ताटी पद्धतीचा वापर करावा.
मंडप केल्याने फळे जमिनीपासून पाच ते सहा फूट उंचीवर वाढतात, त्यामुळे पाने आणि फळे यांचा जमिनीशी संपर्क न आल्यामुळे ओलावा लागून ती सडत नाहीत, कीड व रोगांचे प्रमाण कमी राहते. फळे लोंबकळती राहिल्यामुळे त्यांची वाढ सरळ होते. हवा आणि सूर्यप्रकाश सारखा मिळाल्यामुळे फळांचा रंग सारखा आणि चांगला राहतो. वेल मंडपावर पोचेपर्यंत दीड ते दोन महिने कालावधी जातो, यामुळे पिकामध्ये पालेभाज्यांसारखी मिश्रपिके घेता येतात.
लागवडीसाठी फुले ग्रीन गोल्ड, हिरकणी या सुधारित जातींची निवड करावी. हेक्टरी दोन ते अडीच किलो बियाणे लागते. लागवड दीड ;एक मीटर अंतरावर करावी. माती परीक्षणानुसार 20 टन शेणखत व 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाशची मात्रा द्यावी. आठ ते दहा दिवसांच्या अंतराने हंगाम व गरजेनुसार पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. 15 ते 20 दिवसांच्या अंतराने नियमित खुरपणी करावी. लागवडीनंतर एक महिन्यांनी वरखतांची मात्रा द्यावी.
- 02426-243342
भाजीपाला सुधार योजना, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
-----------------------------------------------------------------------------------
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
पावसाळा सुरू होताच चांगल्या जातीची कलमे सरकारमान्य...
तूर -तुरीचे घरचे बियाणे असल्यास पेरण्यापूर्वी उगवण...
मनीषा व देवनाथ जाधव या दांपत्याने तुती लागवड आणि र...
अळूच्या लागवडीसाठी भरपूर सेंद्रिय पदार्थ असणारी, म...