सोयाबीन हे महत्वाचे तेलबिया पिक म्हणून सर्वपरिचित आहे. सोयाबीन मध्ये ४० टक्के प्रथिने आणि १९ टक्के खाद्यतेल असल्यामुळे जगतिकस्तरावर महत्वाचे पिक म्हणून गणले जाते. एकूण तेल उत्पादनापैकी जवळजवळ ५८ टक्के सोयाबीन तेलाचा वाटा आहे. तर एकूण प्रथिनांपैकीं जळजवळ ६० टक्के प्रथिने सोयाबीन पासून उपलब्ध होतात. अलीकडे सोयाबीन लागवड फार मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. त्यापासून साधारणपणे ५ दशलक्ष टन इतकं उत्पादन मिळत . कमी खर्चात जास्तीतजास्त उत्पादन देणारे नगदी पीक म्हणून सोयाबीनच्या क्षेत्रात झपाट्याने वाढ झालेली आहे.
देशात सोयाबीनची उत्पादकता (१०० किलो/हेक्टर) निम्मी आहे. जनावरांसाठी आणि कुकुटपालनासाठी देखील सोयाबीन पेंडीचा पौष्टिक आहार म्हणून उपयोग केला जातो . याशिवाय सोयाबीनपासून सोयामिल्क ,सोया बिस्कीट ,सोयावाडीसारखे १०० च्या वर वेगवेगळे उपपदार्थ तयार करता येतात . सोयाबीन झाडाच्या मुळांवरील रायझोबियम जीवाणूच्या गाठीद्वारे हेक्टरी १०० किलोपर्यंत नत्र जमिनीत स्थिर होते. तसेच जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण वाढल्याने सोयाबीनचा बेवड म्हणून चांगला उपयोग होतो. सोयाबीनच्या झाडाचा पालापाचोळा जमिनीवर पडल्यामुळे जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते. सोयाबीनला निसर्गाने मानवाला दिलेली देणगी संबोधले जाते . तर पाश्चात्य देशामध्ये या पिकास कामधेनु तर चीनमध्ये मातीतील सोने म्हणून संबोधले जाते.
उमध्यम ते भारी , चांगला निचरा होणारी , गालाची जमीन सोयाबीनच्या लागवडीसाठी उत्तम असते . हलक्या जमिनीत सोयाबीनचे उत्पादन कमी होते . ज्या जमिनीत पाणी साठून राहते. त्या जमिनीत सोयाबीनची उगवण चांगली होत नाही. जमिनीचा सामू ६ ते ६.५ च्या आसपास आणि विद्युतवाहकता ४.० डेसी सायमन / मीटरपेक्षा कमी असल्यास अशा जमिनीत सोयाबीनचे पिक उत्तम येते .
उष्ण हवामान या पिकास चांगले मानवते. तापमान १८ ते ३५ अंश से.ग्रे. मध्ये पिकाची वाढ चांगली होते. मुख्यत्वे सोयाबीन खरीप हंगामात घेतले जाते. या पिकास वार्षिक ६०० ते १००० मी.मी. पर्जन्यमानाची आवश्यकता असते.
जमीन खोल नांगरुन उभ्या आढ्या कुळवाच्या तूंन पाळ्या र्दछन जर्णीन चांगली भुसभुशीत करावी. त्यानंतर चांगलं कुज़लल शैण्छत किंव कंपक्टि ठत ईक्टरी २५ ते ३०गाड्या वापराव्या .
कालावधी - खतांची मात्रा व वेळेवर पूस असल्यास पिक ९० ते १०० दिवसात तयार होते.
एम.ए.सी.एस.१३,एम.ए.सी.एस.५८ ,एम.ए.सी.एस.१२४ ,एम.ए.सी.एस.४५०,एम.ए.सी.एस.११८८,फुले कल्याणी (डी.एस.२२८),फुले अग्रणी ,जे.एस.९३-०५ ,जे.एस ९७-५२ , जे.एस ९५-६० ,एन.सी.आर ३७ एम.ए.यु.एस.-४७ , एम.ए.यु.एस.-६१,एम.ए.यु.एस.६१-२, एम.ए.यु.एस.-७१,एम.ए.यु.एस.-८१, एम.ए.यु.एस.-१५८,जे.एस.३३५, टीए.एम.एस.९८-२१
बियाणे प्रमाणे - सोयाबीनची उगवणशक्ती ७० टक्केच्यावर असल्यास हेक्टरी ७५ किलो बियाणे वापरावे.
उग्वणीच्या काळात बुरशीजन्य रोगांपासून संरक्षण होण्यासाठी जैविक बुरशीनाशके किंवा बुरशीनाश्कांची बीजप्रक्रिया आवश्यक आहे. त्यासाठी पेरणीपूर्व प्रती किलो बियाण्यास ३ ग्रम थायरम किंवा २ ग्रॅम थायरम २.५ ग्रॅम बाविस्टीन व ४ ग्रॅम ट्रायकोडर्मा या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. तसेच सोयाबीन पिकास रायझोबीयम जॅपोनिकम व स्फुरद विरघळणारे जिवाणू यांची प्रत्येकी २५० ग्रॅम/१० किलो बियाणे याप्रमाणात बीजप्रक्रिया करावी व बियाणे सावलीत वाळवून पेरणीस वापरावे. बीजप्रक्रिया करताना बियाणे हलक्या हाताने चोळावे तसेच प्रथम बुरशीनाशकांची बीजप्रक्रिया करावी व नंतर जैविकखताची बीजप्रक्रिया करावी.
सोयाबीन पिकाची उगवण होण्यासाठी जमिनीत पुरेशी ओल असणे आवश्यक आहे त्यासाठी वाफशावर पेरणी करावी तसेच पूर्ण उगवण झाल्यावर गरजेनुसार शक्य असल्यास पाणी द्यावे. पेरणी १५ जून ते १५ जुले दरम्यान करावी. पेरणी ४५ x ५ सें.मी. अंतरावर करावी. पेरणी करताना बियाणे ३-५ सें.मी. पेक्षा जास्त खोल जाणार नाही, याची काळजी घ्यावी.
सोयाबीन पिकास हेक्टरी ५0 किलो नत्र + ७५ कि. स्फुरद + ३० किलो गंधक पेरणीपूर्वी किंवा पेरणीच्या वेळी द्यावे. जमिनीत जस्त या अन्नद्रव्याची कमतरता असल्यास २५ किलो झिंक सल्फेट पेरणीच्यावेळी द्यावे. तसेच उत्पादन वाढीच्या दृष्टीने १० किलो बोरॅक्स प्रति हे. पेरणीच्यावेळी द्यावे.
सोयाबीन पिकास सुरवातीचे ६-७ आठवडे हे तण वाढीच्या दृष्टीने संवेदनक्षम असल्याने सुरवातीला पीक तणविरहीत ठेवणे अधिक उत्पादनाच्या दृष्टीने महत्वाचे आहे. त्यासाठी २०-३० दिवसांनी एक कोळपणी तर ४५ दिवसांनी दुसरी कोळपणी द्यावी. त्याचबरोबर गरजेनुसार १-२ खुरपण्या देऊन पीक तणविरहीत ठेवावे. तण नियंत्रणाच्या दृष्टीने रासायनिक तणनाशकामुळे चांगल्याप्रकारे सोयाबीनमधील तणांचा बंदोबस्त झाल्याचे दिसून येते.
फ्लुक्लोरॅलीन १ कि./हे. किंवा ट्रायफ्लुरॅलीन १ कि./हे. यापैकी कोणतेही एक तणनाशक ६०० ते ७०० लीटर पाण्यातून मिसळून जमिनीवर सारखी फवारणी करावी व वखराची पाळी देऊन जमिनीवर मिसळून द्यावे.
(पीक पेरणीनंतर त्याच दिवशी किंवा अंकुर जमिनीवर येण्याआधी) अलॅक्लोर २ किलो क्रियाशील घटक /हेक्टर किंवा मेटॅलॅक्लोर २ किलो क्रियाशील घटक /हेक्टर किंवा पेंडीमिथेंलीन १ किलो क्रियाशील घटक /हेक्टर प्रमाणे फवारणी करावी.
कोरडवाहू शेती पद्धतीत सोयाबीन पुष्कळदा सलग पीक म्हणून घेतात, परंतु आपण सलग पीक न घेता आंतरपीक पद्धतीचा अवलंब करणे अत्यंत आवश्यक आहे, याची कारणे पुढीलप्रमाणे आहेत.
सोयाबीनवर महाराष्ट्रात आढळणा-या किडीच्या नियंत्रणासाठी खालील उपाययोजना करावी
अ) कोड नियंत्रण
क्लोरोपायरीफॉस २0 टक्के इसी १.५ लि. प्रति है. किंवा ट्रायझेफॉस ४० टक्के इसी ८oo मि.ली. पेरणीनंतर ८ ते १० दिवसांनी आणि पीक फुलो-यात असताना ५oo-७o० लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारावे.
पाण्यात मिसळणारी ५० टक्के कार्बारील भुकटी प्रती हेक्टरी २ किलो ५०० लिटर पाण्यात मिसळून फवारावी.
मेथिल डिमेटॉन २५ इसी ६oo मि.ली. किंवा फॉसफॉमिडॉन ८५ इसी २oo मि.ली. किंवा मोनोक्रोटोफॉस ३६ एस सी ८oo मि.ली. यापैकी एका कीटकनाशकांचा प्रती हेक्टरी ५00 लीटर पाण्यात मिसळून फवारा द्यावा.
पावसाळ्याच्या सुरुवातीस कडुनिंब व बाभळीच्या झाडावर किटकनाशकांचा फवारा देऊन मुंगेच्यांचा नाश करावा. शेतात शेणखत पसरण्यापूर्वी त्यात असलेल्या हुमणीच्या अंडी व अळ्यांचा नाश करण्यासाठी १० टक्के फॉलिडॉल भुकटी मिसळावी. शेतात मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आढळल्यास ५ टक्के क्लोरेडेन किंवा ५ टक्के हेप्टाक्लोर भुकटी प्रती हेक्टरी ६५ केिली जमिनीत मिसळावी.
ब) रोग नियंत्रण
या पिकावर केवडा, तांबेरा, देवी, मूळकुजव्या इ. रोग येतात. या रोगाच्या नियंत्रणासाठी पहिली फवारणी हेक्झाकोनेझोल ५ इसी १ लिटर (प्रतिबंधात्मक) आणि रोगाचा प्रादुर्भाव आढळल्यास दुसरी फवारणी प्रॉपिकोनेझोल २५ इसी १ लिटर या बुरशीनाशकांची प्रती हेक्टरी १ooo लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
पिकाची काढणी, मळणी व उत्पादन : जेव्हा झाडावरील पाने पिवळी पडून गळल्यानंतर आणि ९५ टक्के शेंगा तपकिरी रंगाच्या झाल्यावर काढणी करावी. काढणीस उशीर झाल्यास शेंगा झाडावरच तडकून बी बाहेर पडते व उत्पादनाचे नुकसान होते. काढणी केल्यानंतर मळणीयंत्राच्या सहाय्याने मळणी करून घ्यावी.
उत्पादन : सोयाबीनपासून हेक्टरी २५ ते ३० किंटल उत्पादन मिळते.
संपर्क क्र. O२५७-२२५o८८८, ९८५o३२७८७३
स्त्रोत - कृषी विभाग महाराष्ट्र शासन
अंतिम सुधारित : 10/7/2020
गेल्या काही वर्षांपासून दुग्ध व्यवसाय शेती जोड धंद...
काळी मिरीची काढणी कधी करावी याबाबतची माहिती येथे द...
दालचिनीच्या झाडापासून साल आणि तमालपत्र मिळते. लागव...
सोयाबीन हे महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात घेतले ...