सर्वसाधारणपणे पिकामध्ये येणारे तण हे उत्पादन कमी करत असल्याचे मानले जाते. मात्र जंगली भातवर्गीय तणांतील काही जनुकीय गुणधर्म अधिक सहनशील, ताकदवान आणि अधिक उत्पादनक्षम भातजाती विकसित करण्यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावणार असल्याचे दिसून आले आहे. त्या संदर्भात अमेरिकी कृषी विभागातील वनस्पती शरीरशास्त्रज्ञ लेविस झिस्का आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अभ्यास केला आहे. त्याचे निष्कर्ष "फंक्शनल प्लॅंट बायोलॉजी'मध्ये प्रकाशित झाली आहेत.
भातामध्ये भातवर्गीय जंगली जाती उगवून येतात. त्यामुळे भात उत्पादनामध्ये मोठी घट येते. मात्र अनेक वेळा लागवडीच्या भातापेक्षा या तणांची वाढ अधिक चांगल्या प्रकारे झाल्याचे दिसून येते.
तापमानामध्ये सातत्याने वाढ होत असून, 2050 या वर्षामध्ये अनेक भात उत्पादक देशांमध्ये भाताचे उत्पादन घटण्याचा शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर अमेरिकी कृषी संशोधन सेवा विभागातील शास्त्रज्ञ लेविस झिस्का यांनी मेरीलॅंड येथील प्रक्षेत्रामध्ये भातांच्या विविध जातींवर तापमानातील बदल आणि कार्बन- डाय-ऑक्साईडच्या वाढत्या प्रमाणामुळे होणारे परिणाम तपासले आहेत. त्यामध्ये काही भात जातींनी वाढत्या कर्बवायूंच्या प्रमाणाशी जुळवून घेण्यासाठी आवश्यक जनुकीय गुणधर्मांचा शोध घेण्याचा प्रयत्न होता. त्यासाठी सध्या प्रचलित असलेल्या भात जातींवरील कर्बवायू आणि दिवस, रात्रीतील तापमानाच्या पातळीचा परीणाम तपासला.
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
उत्पादनसंस्थेला वस्तूचे उत्पादन करण्यासाठी निरनिरा...
कळंबपासून 10 किमी अंतरावर असलेल्या चापर्डा या गावा...
ऊस हे आपले प्रमुख नगदी पीक असून करार शेती असल्याने...
अभ्यास, ज्ञान मिळवण्याची वृत्ती, जिद्द, चिकाटी आणि...