महाराष्ट्रात सन २०१४-१५ या वर्षात गव्हाखाली एकूण ८.९५ लाख हेक्टर क्षेत्र होते तर उत्पादन १२.३६ लाख टन मिळाले आणि उत्पादकता १३.८१ किंव./हे. होती. भारताच्या तुलनेत (राष्ट्रीय उत्पादकता २९.८९ क्वीं./हे.) महाराष्ट्रातील गव्हाची उत्पादकता ही देशाच्या उत्पादकतेपेक्षा खूपच कमी आहे. महाराष्ट्रातील उत्पादकता कमी असण्याची बरीच कारणे आहेत. पूर्वी महाराष्ट्रात गव्हाचे बागायती क्षेत्र खूपच कमी होते. परंतु, आता बागायती क्षेत्र बरेच वाढलेले आहे. गव्हाच्या पिकाखालील बागायती क्षेत्रात जसजशी वाढ होत गेली तसतसे एकूण उत्पादन आणि सरासरी उत्पादन वाढलेले आढळून आले आहे. यामध्ये अधिक उत्पादन देणा-या गव्हाच्या वाणांचा प्रमुख वाटा आहे.
गहू पिकासाठी पाण्याचा चांगला निचरा होणारी मध्यम ते भारी जमीन अत्यंत आवश्यक असते.
गहू पिकासाठी थंड, कोरडे आणि स्वच्छ सूर्यप्रकाश असणारे हवामान चांगले मानवते. गहू पिकाच्या वाढीसाठी ७ ते २१ अंश सें.ग्रे. तापमानाची आवश्यकता असते. दाणे भरण्याच्यावेळी २५ अंश सें.ग्रे. इतके तापमान असल्यास दाण्यांची वाढ चांगली होऊन दाण्यांचे वजन वाढते.
गव्हाच्या मुळ्या ६० सें.मी. ते १.00 मीटर खोलीपर्यंत वाढत असल्याने गव्हाच्या योग्य वाढीसाठी जमीन चांगली भुसभुशीत असणे आवश्यक आहे. यासाठी खरिप पीक काढणीनंतर लोखंडी नांगराने १५ ते २० सेमी खोलवर जमिनीची नांगरट करावी. त्यानंतर कुळवाच्या ३ ते ४ पाळ्या देऊन जमीन चांगली भुसभुशीत करावी. शेवटच्या कुळवणी अगोदर २५ ते ३० बैलगाड्या चांगले कुजलेले शेणखत किंवा कंपोस्ट खत पसरवून टाकावे. तसेच पूर्वीच्या पिकांची धसकटे व इतर काडीकचरा वेचून शेत स्वच्छ करावे.
बागायती गव्हाची पेरणी नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात करावी व उशिरा पेरणी १६ नोव्हेंबर ते १५ डिसेंबरपर्यंत करावी. बागायती गव्हाची पेरणी १५ नोव्हेंबरनंतर उशिराने केल्यास प्रत्येक पंधरवड्यात गव्हाचे उत्पादन हेक्टरी २.५ किंवटल एवढे घटते असे आढळून आलेले आहे.
जिरायत गव्हाची पेरणी ऑक्टोबरच्या दुस-या पंधरावड्यात करावी.
गव्हाच्या वेळेवर आणि जिरायत पेरणीसाठी दोन ओळीत २0 सें.मी. तर उशिरा पेरणीसाठी १८ सें.मी. अंतर ठेवून पाभरीने पेरणी करावी. तसेच पेरणी ५ ते ६ सें.मी. खोल करावी. त्यामुळे उगवण चांगली होते. गव्हाची पेरणी उभी आडवी न करता एकेरी करावी म्हणजे आंतरमशागत करणे
२० सें.मी. खोलवर जमिनीची नांगरट करावी. त्यानंतर कुळवाच्या ३ ते ४
सोईचे होते. शक्यतो पेरणी दक्षिणोत्तर करावी.
सध्यस्थितीत महाराष्ट्रात विविध परिस्थितीसाठी खालील वाण प्रसारित करण्यात आलेले आहेत.
वाणाचे नाव | वैशिष्टे |
---|---|
कोरडवाहू लागवड |
|
पंचवटी (एन.आय.दि.ए.डब्लू-१५ |
(१) जिरायती पेरणीसाठी उत्तम बन्सी वाण(२) दाणे टपोरे, चमकदार आणि आकर्षक (३) प्रथिनांचे प्रमाण (एन.आय.डी.ए.डब्लू-१५ ) १२ टक्के (४) तांबेरा रोगास प्रतिकारक (५) रवा, शेवया, कुरडया यासाठी उत्तम (६) १o५-११० दिवसात कापणीस तयार (७) उत्पादन १२ ते १५ किंवटल प्रती हेक्टर नेत्रावती |
नेत्रावती (एन.आय.ए.डब्लू १४१५) |
(१) द्विपकल्पीय विभागातील जिरायतीत किंवा एका ओलिताखाली वेळेवर पेरणीसाठी (२) तांबेरा रोगास (एन.आय.ए.डब्ल्यू. १४१५) प्रतिकारक (३) प्रथिने १२ टक्क्यांपेक्षा जास्त (४)चपातीसाठी उत्तम (५) लोह ४३ पीपीएम, जस्त ५५.५ पीपीएम (६) उत्पादन : जिरायत १८ ते २० किंव./हेक्टर, एक सिंचन २२ ते २५ किंव./हेक्टर बागायती वेळेवर पेरणी त्र्यंबक |
बागायती वेळेवर पेरणी |
|
त्र्यंबक (एन.आय.ए.डब्लू ३०१) |
(१) बागायती वेळेवर पेरणीसाठी उत्तम सरबती वाण (२) दाणे टपोरे आणि आकर्षक (३) प्रथिनांचे प्रमाण
१२ टक्क्यांपेक्षा अधिक (४) तांबेरा रोगास प्रतिकारक (५) चपातीसाठी उत्तम वाण (६) ११o-११५ दिवसात कापणीस तयार (७) उत्पादन ४५ ते ५o किंवटल प्रती हेक्टर तपोवन |
तपोवन (एन.आय.ए.डब्लू - ९१७) |
(१) बागायती वेळेवर पेरणीसाठी उत्तम सरबती वाण (२) दाणे मध्यम परंतु ऑब्यांची संख्या जास्त (एन.आय.ए.डब्ल्यू-९१७) (३) प्रथिनांचे प्रमाण १२.५ टक्के (४) तांबेरा रोगास प्रतिकारक (५) चपातीसाठी उत्तम वाण (६) ११५- १२० दिवसात कापणीस तयार (७) उत्पादन ४५ ते ५o किंवटल प्रती हेक्टर |
गोदावरी (एन.आय.डी.डब्ल्यू- २९५) | १) बागायती वेळेवर पेरणीसाठी उत्तम बक्षी वाण (२) दाणे टपोरे, चमकदार आणि आकर्षक (३) प्रथिनांचे प्रमाण १२ टक्क्यांपेक्षा अधिक (४) तांबेरा रोगास प्रतिकारक (५) रवा, शेवया, कुरडया यासाठी उत्तम (६) ११५ - १२० दिवसात कापणीस तयार (७) उत्पादन ४५ ते ५o किंवटल प्रती हेक्टर |
फुले समाधान (एन.आय.ए.डब्ल्यू- १९९४) | (१) महाराष्ट्र राज्यातील बागायत वेळेवर आणि बागायत उशिरा पेरणीसाठी योग्य (२) तांबेरा रोगास प्रतिकारक (३) प्रथिने १२ टक्क्यांपेक्षा जास्त (४) चपातीसाठी उत्तम (५) उत्पादन : वेळेवर पेरणी- ४५ ते ५० किंवटल प्रती हेक्टर तर उशिरा पेरणी - ४२ ते ४५ किंवटल प्रती हेक्टर |
एम.ए.सी.एस.- ६२२२ | (१) द्विपकल्पीय विभागात बागायती वेळेवर शिफारशीत सरबत्ती वाण (२) टपोरे दाणे (३) प्रथिने १२.५ टक्क्यांपेक्षा अधिक (४) तांबेरा रोगास प्रतिकारक (५) चपातीसाठी उत्तम वाण (६) ११५ ते १२० दिवसात कापणीस तयार (७) उत्पादन ४५ ते ५o किंवटल प्रती हेक्टर |
एम.ए.सी.एस. - ६४७८ | (१) द्विपकल्पीय विभागात बागायती वेळेवर शिफारशीत सरबत्ती वाण (२) टपोरे दाणे (३) प्रथिने १४ टक्क्यांपेक्षा अधिक (४)तांबेरा रोगास प्रतिकारक (५) चपातीसाठी उत्तम (६) सुक्ष्मअन्नद्रव्ये (उच्च पोषणमूल्ये) : लोह ४२.८ पी.पी.एम., जस्त ४४.१ पी.पी.एम.(प्रति दशलक्ष भाग) (७) पक्व होण्याचा कालावधी ११५ ते १२० दिवस (८) उत्पादनक्षमता ४७ ते ५२ किंवटल/हेक्टरी |
बागायती उशिरा पेरणी | |
एन.आय.डी.डब्लू - ३४ | (१) बागायती उशिरा पेरणीसाठी उत्तम सरबत्ती वाण (२) दाणे मध्यम आणि आकर्षक (३) प्रथिनांचे प्रमाण १३ टक्के (४) तांबेरा रोगास प्रतिकारक (५) चपातीसाठी उत्तम वाण (६) १oo ते १o५ दिवसात कापणीस तयार (७) उत्पादन ३५ ते ४० किंवटल प्रती हेक्टर |
ए.के.ए.डब्ल्यू- ४६२७ | (१) द्विपकल्पीय विभागात बागायती उशिरा पेरणीसाठी शिफारशीत सरबती वाण (२) तांबेरा रोगास प्रतिकारक (३) प्रथिने १२ टक्क्यांपेक्षा जास्त (४) चपातीसाठी उत्तम (५) पक्व होण्याचा कालावधी बागायती वेळेवर पेरणीसाठी ९५-१oo दिवस (६) उत्पादनक्षमता बागायती उशिरा पेरणीखाली ४२ ते ४५ किंवटल/ हेक्टरी |
ए.के.ए.डब्ल्यू- ४२१o | (१) महाराष्ट्रातील बागायती उशिरा पेरणीसाठी शिफारशीत सरबती वाण (२) तांबेरा रोगास प्रतिकारक (३) प्रथिने १२ टक्क्यांपेक्षा जास्त (४) चपातीसाठी उत्तम (५) पक्व होण्याचा कालावधी बागायती वेळेवर पेरणीसाठी ९५-१oo दिवस (६) उत्पादन ४२ ते ४५ किंवटल प्रती हेक्टर. |
गहू पिकासाठी रासायनिक खतांच्या मात्रा जिरायत, बागायत वेळेवर व बागायत उशिरा पेरणीसाठी वेगवेगळ्या शिफारस केलेल्या आहेत.
पेरणीच्या वेळी |
नत्र (किलो हेक्टर) |
स्फुरद (किलो हेक्टर) |
पालाश (किलो हेक्टर) |
---|---|---|---|
बागायत वेळेवर पेरणी | १२० | ६० | ४० |
बागायत उशिरा पेरणी |
८० | ४० | ४० |
जिरायत पेरणी | ४० | २० | 00 |
बागायती गहू पिकासाठी अर्धे नत्र , संपूर्ण स्फुरद व पालाश पेरणीच्या वेळी द्यावे व राहिलेले अर्धे नत्र पेरणीनंतर तीन आठवड्यांनी खुरपणी झाल्यावर आणि पहिल्या पाण्याच्या पाळी अगोदर द्यावे. जिरायत पेरणी करताना नत्र आणि स्फुरद पेरणीच्यावेळी द्यावे .
नत्र ( कि./हे.)= (७.५४ *अपेक्षित उत्पादन )- (०.७४ * जमिनीतील उपलब्ध नत्र कि./हे.)
स्फुरद (कि./हे.)=(१.९० * अपेक्षित उत्पादन )- (२.८८ * जमिनीतील उपलब्ध नत्र कि./हे.)
पालाश (कि./हे.)=(१.९० * अपेक्षित उत्पादन )-(०.२२ * जमिनीतील उपलब्ध पालाश कि./हे.)
गव्हाची पेरणी शक्यतो पेरणीपूर्वी शेत न ओलवता उपलब्ध ओलावा असताना करावी. पेरणीनंतर साधारणपणे १८ ते २१ दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाळ्या द्याव्यात . पाणी देण्याच्या दृष्टीने पिक वाढीच्या महत्वाच्या संवेदनशील अवस्था पुढीलप्रमाणे आहे.
अपुऱ्या पाणी पुरवठा परिस्थितीही कमी पाण्यात अधिक उत्पादनक्षम वाणांचा वापर करून खालीलप्रमाणे पाणी व्यवस्थापन करावे.
तुलनेत ४१ टक्के घट येते आणि दोन पाणी दिले तर उत्पादनात २0 टक्के घट येते.
गव्हाची जिरायत आणि बागायत पेरणी करुन पीक तयार झाल्यानंतर परंतु दाण्यामध्ये १२ टक्के पाण्याचे प्रमाण असताना पिकाची कापणी अशाप्रकारे तांत्रिक पद्धतीने गव्हाची पेरणी केल्यास जिरायत गव्हाचे प्रती हेक्टरी १२ ते १५ किंवटल तर बागायत वेळेवर गव्हाचे प्रती हेक्टरी
४५ ते ५o किंवटल आणि बागायत उशिरा गव्हाचे प्रती हेक्टरी ३५ ते
गव्हास एकच पाणी दिले तर पुरेशा पाण्यापासून आलेल्या उत्पादनाच्या
४0 किंवटल उत्पादन निश्चित मिळेल.
स्त्रोत - कृषी विभाग, महाराष्ट्र शासन
अंतिम सुधारित : 10/7/2020
सध्याच्या काळात मीठा बहराच्या अंजीर फळांच्या वाढीक...
मनीषा व देवनाथ जाधव या दांपत्याने तुती लागवड आणि र...
तूर -तुरीचे घरचे बियाणे असल्यास पेरण्यापूर्वी उगवण...
पावसाळा सुरू होताच चांगल्या जातीची कलमे सरकारमान्य...