1) बरसीमचा चारा पालेदार असून, सकस व रुचकर असतो. यामध्ये प्रथिनांचे प्रमाण 17 ते 19 टक्के इतके असते. बरसीम पिकासाठी मध्यम व भारी, तसेच चांगला निचरा होणारी जमीन निवडावी.
2) लागवड ऑक्टोबर- नोव्हेंबर महिन्यात करावी. लागवडीसाठी वरदान, मेस्कावी, जे. बी. 1, जे. एच. बी. 146 या जास्त उत्पादन देणाऱ्या जातींची निवड करावी. प्रति हेक्टरी लागवडीसाठी 30 किलो बियाणे लागते. पेरणी 30 सें. मी. अंतराने करावी.
3) पेरणी करण्यापूर्वी प्रति दहा किलो बियाण्यास 250 ग्रॅम रायझोबियम जिवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया करावी, त्यामुळे उगवण चांगली होते.
4) पेरणीपूर्वी प्रति हेक्टरी 15 ते 20 टन शेणखत जमिनीत मिसळून द्यावे, तसेच पेरणीपूर्वी माती परीक्षणानुसार 20 किलो नत्र, 80 किलो स्फुरद व 40 किलो पालाश प्रति हेक्टरी द्यावे.
5) पेरणी केल्यानंतर पहिली कापणी साधारणपणे 45 ते 50 दिवसांनी करावी, त्यानंतरच्या कापण्या 25 ते 30 दिवसांच्या अंतराने कराव्यात. या पिकाच्या तीन-चार कापण्या मिळतात. योग्य व्यवस्थापन केल्यास तीन-चार कापणीचे चारा उत्पादन 600 ते 800 क्विंटल प्रति हेक्टर इतके मिळते.
1) ओट पिकाचा पाला हिरवागार, रसाळ, रुचकर व पौष्टिक असून, खोडदेखील रसाळ व लुसलुशीत असते. प्रथिने, शर्करायुक्त पदार्थ व विविध खनिजांचा पुरवठा करण्यासाठी हे सरस पीक आहे.
2) क्षारयुक्त अथवा पाणथळीच्या जमिनी वगळून इतर सर्व प्रकारच्या जमिनीत याची लागवड करावी. पाण्याचा उत्तम निचरा असणारी जमीन या पिकास चांगली मानवते. हे पीक थंड व उबदार हवामानात चांगले येते.
3) जमिनीची चांगली मशागत करून ऑक्टोबर- नोव्हेंबरमध्ये याची लागवड करावी. लागवडीसाठी फुले हरिता, केंट या जातींची निवड करावी. लागवड पाभरीने 30 सें. मी. अंतरावर करावी. हेक्टरी 100 किलो बियाणे लागते. पेरणीपूर्वी प्रति 10 किलो बियाण्यास 250 ग्रॅम ऍझोटोबॅक्टर जिवाणू संवर्धकाची बीजप्रक्रिया करावी.
4) पेरणी करताना माती परीक्षणानुसार 50 किलो नत्र, 50 किलो स्फुरद व 30 किलो पालाश ही खतमात्रा द्यावी. नत्र खताचा दुसरा हप्ता हेक्टरी 50 किलो पेरणीनंतर 25 ते 30 दिवसांनी द्यावा.
5) तणनियंत्रणासाठी 25 ते 30 दिवसांनी निंदणी अथवा खुरपणी करावी, त्यापुढील कालावधीत पिकांची उंची व वाढ जलद होत असल्यामुळे तणांचा जोर कमी होत जातो.
6) हिरव्या चाऱ्याचे उत्पादन अधिकाधिक प्रमाणात येण्यासाठी जमिनीच्या प्रकारानुसार दहा ते बारा दिवसांच्या अंतराने पाण्याच्या पाच ते सहा पाळ्या द्याव्यात.
7) पहिली कापणी 50 ते 55 दिवसांनी करावी. दुसरी कापणी 40 दिवसांनी करावी. जातीनुसार प्रति हेक्टरी सरासरी दोन कापण्यांमध्ये 600 क्विंटल हिरव्या चाऱ्याचे उत्पादन मिळते. हिरव्या चाऱ्यात आठ ते नऊ टक्के प्रथिने असतात.
संपर्क- 02426 - 243256
चारा पिके संशोधन प्रकल्प,
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.
-----------------------------------------------------------------------------------------------
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
तूर -तुरीचे घरचे बियाणे असल्यास पेरण्यापूर्वी उगवण...
पावसाळा सुरू होताच चांगल्या जातीची कलमे सरकारमान्य...
अळूच्या लागवडीसाठी भरपूर सेंद्रिय पदार्थ असणारी, म...
सध्याच्या काळात मीठा बहराच्या अंजीर फळांच्या वाढीक...