शास्त्रीय नाव - Amaranthus spinosus ..............(ॲमरेन्थस स्पायनोसस)
कुळ - Amaranthacear (ॲमरेन्थेसी)
इंग्रजी नाव - प्रिकली अॅमरेन्थ
हिंदी नाव - कांटा चौलाई
पावसाळ्यात पडीक- ओसाड जमिनीवर, रस्त्यांच्या कडेस, शेतात, कचऱ्याच्या ढिगांवर, सर्वत्र तण म्हणून काटेमाठ ही वनस्पती वाढलेली आढळते. काटेमाठ साधारणतः एक ते दोन फुटांपर्यंत उंच वाढते.
खोड - गोलाकार, सरळ उंच वाढणारे. फांद्या अनेक, हिरवट, लालसर पानांच्या बेचक्यातून अर्धा इंच लांब काटे तयार होतात.
पाने - साधी, एका आड एक, २ ते ६ सें.मी. लांब व ०.५ ते ३.५ सें.मी. रुंद, अंडाकृती, विशालकोनी.
फुले - लहान, एकलिंगी, नियमित, हिरवट-पिवळसर, फांद्यांच्या टोकांवर तसेच पानांच्या बेचक्यांतून तयार होणाऱ्या लांबट पुष्पमंजिरीत येतात. नरफुले व मादीफुले संख्येने विपुल, एकाच पुष्पमंजिरीत येतात. पुष्पकोष ५ पाकळ्यांचा, पाकळ्या तळाकडे चिकटलेल्या. पुंकेसर ५. बीजांडकोष एक कप्पी, परागवाहिन्या दोन.
फळे - लहान, बोंडवर्गीय लंबवर्तुळाकृती, वरचा भाग जाड, सुरकुतलेला. बिया २ ते ३, चकचकीत काळसर, गोल आकाराच्या. काटेमाठ या वनस्पतीला सप्टेंबर ते नोव्हेंबर महिन्यांत फुले व फळे येतात.
साहित्य- काटेमाठाची ताजी कोवळी पाने, कांदा, लसूण, मीठ, हिरव्या मिरच्या, ओले खोबरे, तेल, फोडणीचे साहित्य इ.
कृती - पाने निवडून स्वच्छ धुऊन घ्यावीत. नंतर पाने चिरून घ्यावीत. कांदा व मिरच्या चिरून घ्याव्यात. चिरलेले कांदे फोडणीत तांबूस होईपर्यंत परतावेत. मिरच्यांचे तुकडे व लसणाच्या पाकळ्या फोडणीतच टाकाव्यात. नंतर त्यात चिरलेली भाजी घालावी. गरज वाटल्यास एखादा पाण्याचा हबका मारावा व झाकण ठेवून भाजी शिजवून घ्यावी. भाजी परतून अर्धवट शिजल्यावर चवीनुसार मीठ घालावे. भाजी शिजत आल्यावर ओले खोबरे व कोथिंबीर घालावी.
साहित्य - काटेमाठाच्या कोवळ्या फांद्या व कोवळी पाने, तुरीची डाळ, हिरव्या मिरच्या, लसूण, गूळ, आमसूल, कांदा, तेल, हळद, मीठ, फोडणीचे साहित्य इ.
कृती - भाजी स्वच्छ धुऊन घ्यावी. कोवळ्या फांद्या व पाने देठासहित बारीक चिरून घ्यावीत. तुरीची डाळ चांगली शिजवून घ्यावी, त्यात मीठ, हळद, पाणी घालून चांगली घोटावी. तेलात मोहरी, मिरच्यांचे तुकडे, लसणाच्या पाकळ्या टाकून तळाव्यात. नंतर त्यात चिरलेली भाजी घालून परतून घ्यावी. दोन-तीन वाफा आल्यानंतर त्यावर घोटलेली डाळ ओतावी. अशा प्रकारे काटेमाठाची पातळ भाजी तयार करता येते.
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
करटोलीचे वर्षायू वेल जंगलामध्ये झुडपांवर वाढलेले आ...
रानभाज्या आज नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. रानभ...
आघाडा ही वर्षायू रोपवर्गीय वनस्पती असून, पावसाळ्या...
उष्ण, कोरड्या, कमी पाऊस पडणाऱ्या प्रदेशात गोखरू ही...