1) वेलदोड्याच्या लागवडीसाठी पाण्याचा निचरा होणारी, सेंद्रिय पदार्थयुक्त, रेताड जमीन चांगली असते. दलदलीच्या जागेमध्ये पीक नीट वाढत नाही, त्यावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होतो.
2) वेलदोड्याची अभिवृद्धी झाडाच्या बुंध्याजवळ आलेले नवीन कोंब, तसेच बिया लावून करतात. झाडाच्या बुंध्याजवळचे कोंब मुख्य झाडापासून अलगद बाजूला करावेत. त्यांना एखाद-दुसरे मूळ, तसेच खोडाचा भाग राहील याची काळजी घ्यावी.
3) वेगळे केलेले नवीन जोमदार कोंब कायमच्या जागी लावण्यास योग्य असतात. नैसर्गिक सावली असलेल्या जागेत वेलदोड्याची रोपे लावावीत.
4) लागवडीसाठी 60 x 60 x 45 सें.मी. आकाराचे खड्डे खोदावेत. खड्ड्याच्या तळाला पालापाचोळा टाकावा, त्यावर चांगले कुजलेले शेणखत, 200 ग्रॅम निमपेंड आणि मातीच्या मिश्रणाने खड्डा भरून घ्यावा. खत आणि मातीच्या मिश्रणाने खड्डा जमिनीच्या पातळीपेक्षा 15 सें.मी. उंच करून घ्यावा. नंतर या उंचवट्यावर पिशवीच्या आकाराचा खड्डा काढून रोपाची पिशवी ब्लेडच्या साह्याने कापून अलगद रोप लावावे. रोप जास्त खोल लावू नये. शक्यतो रोपे पावसाळ्यानंतर लावावीत.
संपर्क- 02358 - 280558
कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र,
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली, जि. रत्नागिरी
अंतिम सुधारित : 10/7/2020
तूर -तुरीचे घरचे बियाणे असल्यास पेरण्यापूर्वी उगवण...
पावसाळा सुरू होताच चांगल्या जातीची कलमे सरकारमान्य...
मनीषा व देवनाथ जाधव या दांपत्याने तुती लागवड आणि र...
सध्याच्या काळात मीठा बहराच्या अंजीर फळांच्या वाढीक...