लवंग लागवड ही नारळाच्या बागेत करायची झाल्यास नारळाच्या चार झाडांच्या मध्यभागी (चौफुलीवर) दीड ते दोन वर्षांचे रोप लावावे.
सुपारी बागेत मात्र सलग दोन चौकोन मोकळे सोडून तिसऱ्या चौकोनात मध्यभागी रोप लावावे.
लागवडीसाठी 75 बाय 75 बाय 75 सें.मी. आकाराचे खड्डे खणावेत.
त्यामध्ये दोन टोपली शेणखत, 1.5 किलो सिंगल सुपर फॉस्फेट मातीत मिसळून खड्डे भरून रोप लावावे.
लवंग झाडांना मातीमधील ओलावा मानवतो; परंतु दलदल किंवा कोरडी जमीन ठेवू नये.
झाडांना आवश्यक तेवढी सावली करावी किंवा बागेत केळीची लागवड करावी.
संपर्क - 02358 - 280558
कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र,
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली.
स्त्रोत:अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
अळूच्या लागवडीसाठी भरपूर सेंद्रिय पदार्थ असणारी, म...
तूर -तुरीचे घरचे बियाणे असल्यास पेरण्यापूर्वी उगवण...
पावसाळा सुरू होताच चांगल्या जातीची कलमे सरकारमान्य...
सध्याच्या काळात मीठा बहराच्या अंजीर फळांच्या वाढीक...