काळी मिरीच्या वेलांची लागवड केल्यानंतर तीन वर्षांनंतर किफायतशीर उत्पादन सुरू होते. साधारणपणे मे- जून महिन्यात मिरीला तुरे येतात आणि जानेवारी ते मार्च या कालावधीत मिरीचे घड काढणीस तयार होतात. हिरव्या घडातील एक- दोन दाण्यांचा रंग पिवळा अगर नारिंगी होताच घड तोडावेत, नंतर त्या घडातील मिरीचे दाणे हातांनी वेगळे करावेत किंवा तयार केलेल्या जमिनीवर घडांचे ढीग उन्हात वाळवावेत. ही पद्धत मोठ्या प्रमाणावर एकाच वेळी घड तयार झाले तरच वापरतात. हिरव्या मिरीपासून काळी मिरी तयार करण्यासाठी दाणे बांबूच्या करंडीत गोळा करावेत किंवा पातळ फडक्यात गुंडाळावेत. त्यानंतर एका स्वतंत्र भांड्यात पाणी उकळत ठेवावे.
पाण्याला उकळी येण्यास सुरवात झाल्यानंतर ती करंडी अगर फडक्यात गुंडाळलेली मिरी त्या उकळत्या पाण्यात सुमारे एक मिनीट बुडवून काढावी. अशा रीतीने उकळत्या पाण्यातून बुडवून काढलेली मिरी उन्हामध्ये चटई अगर स्वच्छ फडके अंथरूण त्यावर वाळत ठेवावी. या पद्धतीचे फायदे म्हणजे दाणे दोन ते तीन दिवसांत वाळतात. दाण्यांना आकर्षक काळा रंग येतो. बुरशी लागत नाही. मिरीची प्रत सुधारते. पन्नीयूर- 1 या जातीच्या वेलापासून सरासरी पाच ते सहा किलो हिरवी मिरी मिळते आणि ही मिरी वाळविल्यानंतर दीड ते दोन किलो होते.
संपर्क - 02358 - 282415, 282130, विस्तार क्र - 250, 242
उद्यानविद्या विभाग, कृषी महाविद्यालय, दापोली
माहिती संदर्भ : अॅग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
मसाल्याच्या इतर पिकांप्रमाणेच मिरी पिकास सावलीची आ...
या विभागात मिरी या मसाला पिकाविषयी माहिती दिली आहे...
काळी मिरीची लागवड केल्यानंतर तीन वर्षांनंतर उत्पन्...
काळी मिरीच्या वेलांची लागवड केल्यानंतर तीन वर्षांन...