1) कणगर लागवडीसाठी पाण्याचा निचरा होणारी, भुसभुशीत व सेंद्रिय पदार्थ मुबलक असणारी जमीन निवडावी. भुसभुशीत जमिनीमध्ये मोठ्या आकाराचे व गुळगुळीत पृष्ठभाग असलेले कंद पोसले जातात. नांगरून किंवा खोदून जमीन भुसभुशीत करावी. लागवडीपूर्वी पूर्ण कुजलेले शेणखत अथवा कंपोस्ट मिसळावे. त्यानंतर 90 सें.मी. अंतरावर सरी-वरंबे तयार करावेत.
2) लागवडीसाठी "कोकण कांचन' ही जात निवडावी. लागवडीपासून खांदणीपर्यंतचा कालावधी 180 ते 200 दिवसांपर्यंत असतो.
3) पाणी देण्याची सोय असल्यास एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात लागवड करावी. सरीमध्ये 60 सें.मी. अंतरावर कंद लावून मातीने झाकावेत व ताबडतोब पाणी द्यावे. त्यानंतर आवश्यकतेनुसार तीन ते चार दिवसांनी पाणी द्यावे. अन्य ठिकाणी मात्र पाऊस सुरू झाल्यानंतर वरंब्यावर कंद लावावेत.
4) लागवडीकरिता 120 ते 150 ग्रॅम वजनाचे कंद वापरावेत. एक गुंठा क्षेत्रावर लागवडीकरिता 180 ते 200 कंदांची आवश्यकता असते.
5) एक गुंठा क्षेत्रासाठी लागवडीच्या वेळी 400 ग्रॅम नत्र, 300 ग्रॅम स्फुरद व 400 ग्रॅम पालाश द्यावे. लागवडीनंतर एक महिन्याने 400 ग्रॅम नत्र द्यावे. लागवडीच्या वेळी द्यावयाचा हप्ता खड्ड्यात विभागून द्यावा, लागवडीनंतरचा हप्ता बांगडी पद्धतीने द्यावा.
6) लागवडीनंतर वेलास आधार द्यावा. आधाराकरिता झाडांच्या सुक्या फांद्या किंवा शक्य झाल्यास बांबू, नायलॉन दोरी व प्लॅस्टिक सुतळी यांचा वापर करावा. जेथे सरी लागवड केलेली असेल, अशा ठिकाणी पाऊस सुरू झाल्यानंतर वरंब्याची माती ओढून लागवड केलेल्या सरीचे रूपांतर वरंब्यात करावे.
7) लागवडीनंतर खते देताना मातीची भर देऊन वरंबे पुन्हा सुधारावेत. आवश्यकतेनुसार पिकाची बेणणी करावी.
8) लागवडीनंतर सुमारे साडेसहा ते सात महिन्यांनी वेलाची पाने पिवळी पडू लागतात. या वेळेस प्रथम वेली अलग करून व नंतर कंदांची काढणी काळजीपूर्वक करावी. हेक्टरी 18 टन उत्पादन मिळते.
लेखक-सागर जगदाळे, आजरा, जि. कोल्हापूर
संपर्क - 02358- 280558
कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र,
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली
स्त्रोत:अॅग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
अळूच्या लागवडीसाठी भरपूर सेंद्रिय पदार्थ असणारी, म...
सध्याच्या काळात मीठा बहराच्या अंजीर फळांच्या वाढीक...
तूर -तुरीचे घरचे बियाणे असल्यास पेरण्यापूर्वी उगवण...
पावसाळा सुरू होताच चांगल्या जातीची कलमे सरकारमान्य...