आले पीक लागवडीपूर्वी पूर्वमशागत करताना जमीन भुसभुशीत होण्यासाठी लागवडीपूर्व दोन महिने अगोदर म्हणजेच फेब्रुवारी ते मार्चच्या पहिल्या आठवड्यात जमिनीची खोल नांगरट करून घ्यावी. त्यानंतर एकरी दहा टन शेणखत (दहा ट्रेलर), पाच टन गिरिपुष्पाचा पाला समान विस्कटून घ्यावा. त्यावर कुळवाच्या दोन पाळ्या द्याव्यात म्हणजे शेणखत, गिरिपुष्प पाला मातीत मिसळून जातो. तणाची धस्कटे वेचून जमीन स्वच्छ करावी.
तागाची किंवा धैंचाची पेरणी करून आवश्यकतेनुसार पाणी द्यावे. त्यानंतर 45 दिवसांनंतर ताग फुलोऱ्यात येताच नांगराच्या साह्याने ताग जमिनीत गाडावा म्हणजे उत्कृष्ट हिरवळीचे खत जमिनीत चांगल्या प्रकारे मिसळल्याने आल्याची वाढ चांगली होते.लागवडीसाठी 1 ते 5 मेपर्यंत 3.5 ते चार फूट रुंदीचे, एक फूट उंचीचे व जमिनीच्या उतारानुसार 200 फूट लांबीचे गादीवाफे करावे. गादीवाफे सोडताना अर्धवट कुजलेले शेणखत वापरू नये.
अशा शेणखतामुळे बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते. त्याऐवजी एकरी 500 किलो गांडूळ खत, 200 किलो निंबोळी पेंड, 100 किलो दाणेदार सिंगल सुपर फॉस्फेट मातीत मिसळून मग वाफे सोडावेत. खतांचा वापर माती परीक्षणानुसार करावा. गादीवाफ्यावर सूक्ष्म तुषार सिंचन अथवा ठिबक सिंचन पद्धतीने पाणी देऊन वाफशावर मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आल्याची लागवड करावी. प्रति हेक्टरी 18-20 क्विंटल बेणे लागते.
- अंकुश सोनावले, 9881727534
कृषी सहायक, सातारा
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
सध्याच्या काळात मीठा बहराच्या अंजीर फळांच्या वाढीक...
पावसाळा सुरू होताच चांगल्या जातीची कलमे सरकारमान्य...
अळूच्या लागवडीसाठी भरपूर सेंद्रिय पदार्थ असणारी, म...
तूर -तुरीचे घरचे बियाणे असल्यास पेरण्यापूर्वी उगवण...