कोहळा ही वर्षायू वेल कुकुर्बिटेसी कुलातील असून तिचे शास्त्रीय नाव बेनिन्कासा हिस्पिडा असे आहे. ही वनस्पती मूळची जपान व इंडोनेशियातील असून नंतर तिचा प्रसार इतर प्रदेशांत झाले आहे. भारतात पंजाब, पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र या राज्यांत कोहळ्याची लागवड जास्त प्रमाणात केली जाते.
कोहळ्याची सरपटत वाढणारी वेल प्रतानांच्या साहाय्याने वर चढते. तिची पाने मोठी व खालच्या बाजूने केसाळ असतात. फुले मोठी, एकलिंगी, एकएकटी आणि पिवळी असतात. नर-फुलांचे देठ मादी-फुलांच्या देठाहून लांब असतात. फळे लंबगोल व रसाळ असून पूर्ण पिकल्यावर पांढर्या मेणचट थराने आच्छादलेली दिसतात.
कोहळ्याचे फळ गोड, शीतल, पौष्टिक, सारक, मूत्रल व वाजीकर असते.
दमा, खोकला, मधुमेह इ. विकारांवर ते गुणकारी असते, असा आयुर्वेदात उल्लेख आढळतो. बिया गोड, शीतल आहेत. कोरडा खोकला, ताप, उपदंश इत्यादींवर गुणकारी असतात. बियांचे तेल कृमिनाशक असते.
कोहळ्यांचा गर भाजी, सांडगे व पापड इत्यादींसाठी उपयोगात आहे. उत्तर भारतात कोहळ्यापासून पेठा मिठाई करतात. दक्षिण भारतात कोहळा आमटीत मिसळतात. कोहळ्यापासून महाराष्ट्रात कोहळेपाक बनवितात. कोहळ्याचा रस पेय म्हणूनही घेतात. कोहळ्याचे बी लागवडीसाठी हवे तेव्हा उपलब्ध व्हावे यासाठी व इतर अनेक कारणांसाठी घरात कोहळा टांगून ठेवतात.
स्त्रोत - कुमार विश्वकोश
अंतिम सुधारित : 10/7/2020
जमिनीत वाढणाऱ्या खोडाच्या टोकास सु. १मी. लांब, बिन...
अंजीर फळांचा टिकाऊपणा जास्त वाढविण्याकडे विशेष लक्...
द्राक्षास सर्वाधिक दर मुंबई बाजारपेठेत डिसेंबरमध्य...
मध्यम, ओलावा टिकवून ठेवणारी; परंतु पाण्याचा निचरा ...