आंब्याला मोहोर येण्याच्या वेगवेगळ्या अवस्था आणि त्यांचे व्यवस्थापन
नुकत्याच फुटू लागलेल्या मोहोराच्या बोंग्यावर अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. तेव्हा ज्या बागा नुकत्याच मोहोर फुटण्याच्या अवस्थेत आहेत, अळीच्या नियंत्रणासाठी क्विनॉलफॉस(25 टक्के प्रवाही) 20 मि.लि. किंवा प्रोफेनोफॉस (50 टक्के प्रवाही) 10 मि.लि. प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
तसेच ज्या बागांमध्ये मोहोर येण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे; परंतु मोहोर अद्याप फुललेला नाही, अशा बागांमध्ये तुडतुड्यांचा प्रादुर्भाव आढळून आल्यास इमिडाक्लोप्रीड (17.8 टक्के प्रवाही) तीन मि.लि. किंवा अथवा क्लोथियानिडीन (50 टक्के पाण्यात मिसळणारे दाणेदार कीटकनाशक) 1.2 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
मोहोर फुलण्याच्या अवस्थेत असलेल्या बागांमध्ये शक्यतो कीटकनाशकाची फवारणी टाळण्याचा प्रयत्न करावा अथवा फवारणी करावयाची झाल्यास कडुनिंबयुक्त कीटकनाशकाची फवारणी करावी.
ज्या बागांमध्ये मोहोर मावळलेला आहे आणि बाग फळधारणेच्या अवस्थेत आहे, अशा बागेत पाण्यात मिसळणारे थायामेथोक्झाम (25 टक्के दाणेदार कीटकनाशक) एक ग्रॅम किंवा ट्रायझोफॉस (40 टक्के प्रवाही) 10 मि.लि. प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आंब्यावरील भुरी रोगाच्या नियंत्रणासाठी या फवारणीमध्ये गंधक (80 टक्के पाण्यात मिसळणारे) 20 ग्रॅम किंवा कार्बेन्डाझिम (50 टक्के पाण्यात मिसळणारे) 10 ग्रॅम ही बुरशीनाशके मिसळावीत.
सद्यःस्थितीचा विचार करता, पाऊस पडल्यास मोहोरावर करपा रोग येण्याची शक्यता आहे. तरी अशी परिस्थिती निर्माण झाल्यास करपा रोगाच्या नियंत्रणासाठी कार्बेन्डाझीम (50 टक्के पाण्यात मिसळणारे) 10 ग्रॅम किंवा थायोफिनेट मिथाईल 70 टक्के) 10 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
संपर्क -
डॉ. एस.के.गोडसे - 9423804578
कीटकशास्त्र विभाग, कृषी महाविद्यालय, दापोली
स्त्रोत : अग्रोवन
अंतिम सुधारित : 8/16/2020
या विभागात अंजीर या फळ पिकाविषयी माहिती दिली आहे.
मध्यम, ओलावा टिकवून ठेवणारी; परंतु पाण्याचा निचरा ...
जमिनीत वाढणाऱ्या खोडाच्या टोकास सु. १मी. लांब, बिन...
द्राक्षास सर्वाधिक दर मुंबई बाजारपेठेत डिसेंबरमध्य...