आंब्याच्या अभिवृद्धीसाठी कोय कलम ही साधी व सोपी पद्धत आहे. यापासून मोठ्या प्रमाणावर दर्जेदार कलमे तयार करता येतात. या पद्धतीने कलमे करण्यासाठी मे ते जुलै हा कालावधी योग्य असतो. या पद्धतीत गादी वाफ्यावर कोयी रुजवून 15 ते 20 दिवसांचे रोप मुळासकट कोयीसह काढून घ्यावे. रोपाचा खालचा सात ते नऊ सें. मी.चा भाग ठेवून शेंडा छाटावा. कापलेल्या टोकामधून सुमारे चार ते सहा सें. मी. लांबीचा बरोबर मध्ये काप घ्यावा. ज्या जातीची कलमे करावयाची असतील, त्याची तीन ते चार महिने वयाची, जून, निरोगी आणि डोळे फुगीर, परंतु न फुटलेली 10 ते 15 सें. मी. लांबीची काडी कापून घ्यावी. त्या काडीवरील सर्व पाने कापून टाकावीत आणि काडीच्या खालच्या बाजूस चार ते सहा सें. मी. लांबीचे दोन तिरकस काप विरुद्ध बाजूला देऊन पाचरीसारखा आकार द्यावा. त्यानंतर ही काडी रोपावर दिलेल्या कापात व्यवस्थित बसवावी. कलमाचा जोड दोन सें. मी. रुंद व 20 सें. मी. लांबीच्या पॉलिथिनच्या पट्टीने घट्ट बांधून घ्यावा. नंतर ही कलमे 14 x 20 सें. मी. आकाराच्या पॉलिथिनच्या पिशवीत लावावीत. लावताना कलमांचा जोड मातीच्या वर राहील याची काळजी घ्यावी. कलम बांधल्यापासून 15 ते 20 दिवसांत काडीला नवीन फूट येते.
या पद्धतीने आंबा, काजू, फणस, चिकू, कोकम इत्यादी फळझाडांची अभिवृद्धी करता येते. या पद्धतीत व कोय कलम करण्याच्या पद्धतीत कोणताही बदल नाही; परंतु या पद्धतीत खुंट म्हणून वापरले जाणारे रोप उंच वाढलेले आणि आंब्यामध्ये तीन महिने वयाचे, पहिली फूट जून झाल्यावर, तर काजूमध्ये 45 ते 60 दिवसांचे असते. या रोपावर येणाऱ्या नवीन शेंड्याकडील कोवळ्या फुटीवर कलम केले जाते. काजूमध्ये कलम करण्यासाठी थंडीचा हंगाम वगळता वर्षभर केव्हाही कलमे करता येतात. अधिक माहितीसाठी पुढील क्रमांकावर संपर्क साधावा.
लेखक-किशोर माने, राजापूर, जि. रत्नागिरी
संपर्क - 02366 - 262234
प्रादेशिक फळ संशोधन केंद्र, वेंगुर्ला, जि. सिंधुदुर्ग.
माहिती संदर्भ : अॅग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
रत्नागिरी जिल्ह्यात मालगुंड येथील डॉ. विवेक भिडे य...
दरवर्षी कोणत्या ना कोणत्या कारणाने आबा मोहोराचे पर...
आंबा फळे पिकविण्याचे एक शास्त्र आहे. योग्य पद्धतीन...
आंबा फळामध्ये साका पडतो, काही कलमे वठतात त्यासाठी ...