उन्हाळी भुईमुगामध्ये पाने खाणाऱ्या व गुंडाळणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. त्यांच्या नियंत्रणासाठी त्वरित उपाययोजना कराव्यात.
भुईमुगामध्ये वाढीच्या विविध अवस्था सध्या शेतात दिसून येत आहेत. त्यामध्ये काही किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. प्रादुर्भाव ओळखून त्यावर त्वरित उपाययोजना केल्यास उत्पादनातील घट टाळता येते.
काढणीस तयार झालेल्या वेलाची पाने पिवळी पडतात व सुकतात. पूर्ण वाढलेल्या शेंगांचे टरफल टणक बनते व शेंगांच्या टरफलाची आतील बाजू काळसर दिसू लागते. दाण्याचा आकार पूर्ण वाढलेला असतो व चांगला रुंद झालेला असतो. काढणीस तयार झालेले पीक उपटून शेंगा आकाशाकडे, वेल जमिनीकडे असे ठेवावे. त्यानंतर शेंगांची तोडणी करावी व त्या चांगल्या वाळवून पोत्यात भरून ठेवाव्यात.
संपर्क : डॉ. विलास टाकणखार, 9404677351
(कृषी विज्ञान केंद्र, तुळजापूर, जि. उस्मानाबाद)
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 8/8/2023
अॅडिसन रोग : (बाह्यकज-प्रवर्तक-न्यूनता). अधिवृक्क...
अमिबिक यकृत फोड हा आंतड्यातील परजीवी एन्टामिबा हिस...
डाळिंब पिकामध्ये बॅक्टेरिअल ब्लाइट, मर (फ्युजॅरिय...
ढगाळ हवामानामुळे मावा किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची...