गव्हावर प्रामुख्याने तांबेरा (गेरवा) काजळी किंवा कानी करपा, मर, मुळकुज, खोडकुज आणि कर्नाल बंट या रोगाचा प्रादुर्भाव होत असतो.
गव्हावर येणारा प्रमुख आणि नुकसान कारक रोग म्हणजे तांबेरा. खोडावरचा काळा तांबेरा, पानावरचा नारंगी तांबेरा, पिवळा तांबेरा या तांबेर्याचा प्रसार होत असतो.
खोडावरचा काळा तांबेरा हा बुरशीजन्य रोग असून वक्सीनिया ग्रामिनिस, ट्रिटीसी या बुरशीमुळे होतो. रोगाचा प्रादुर्भाव झाल्यानंतर खोडावर फोड़ येतात.हेच फोड़ पुढे काळसर होतात.सम्पूर्ण खोड काळसर होते.निलगिरी पर्वत आणि पलनी टेकड्यावरून वार्याबरोबर आणि त्या वेळी पडणार्या पावसमुळे हे रोग फैलावतात.
पानावरचा नारंगी तांबेरा हा वक्सीनिया रीकांडीट नावाच्या बुरशीमुळे होतो.गव्हाच्या पानावर नारंगी ठिपके असतात आणि नंतर फोड़ दिसतात.१८ ते २० टक्के तापमान आणि ८ टक्के आर्द्रता या रोगास पोषक असते.
काजळी किंवा काणी हा रोग युस्टिलगो, ट्रिटसी या बुराशीमुळे होतो.ही बुरशी फुलावर वाढते.दाण्याऐवजी काळी भुकटी तयार होते.ही काळी भुकटी म्हणजेच काणी.ठंड आणि आर्द्र हवामानात वाढ होते.
करपा या गहू पिकावरच्या रोगाची लागण अल्टरनेरिया ट्रिटीसिना नावाच्या बुरशीमुळे होतो.
कोरडवाहू पेक्षा बागायती गव्हावर जास्त प्रमाणात अल्टरनेरियाकरपा येतो. रोगाचे प्रमाण जास्त वाढल्यास करप्याचे ठिपके एकत्र मिसळतात आणि संपूर्ण पान करपते. १९ ते २० सेल्सियस तापमान सतत दमट हवामानात या रोगाचा प्रसार होतो.३ ग्राम थायरमची बिजप्रक्रिया करावी आणि उभ्या पिकावर २५ ग्राम झायनेब अगर मन्कोझेब १ लिटर पाण्यातून फवारावे.
गव्हावर फ्युजारिम या बुरशीमुळे मुळकुज तर रायझोक्टोनिया या बुरशीमुळे खोडकुज या रोगाचा प्रादुर्भाव होतो.या रोगांचा एकत्रित परिणाम म्हणजे रोपे पिवळी पडून सुकायाला लागतात आणि शेवटी मरतात. खोडाचा जमीनीलगताचा भाग आणि मुळे कुजतात आणि झाडे कोलमडून पडतात.याच्यावर उपाय म्हणजे अशी झाडे उपटून टाकावित आणि सुरवातीला थायरमची बीजप्रक्रिया करावी.
कर्नाल ब्रंट हा रोग टिर्लोश इंडिका नावाच्या बुराशिमुले होतो.अत्यंत भयानक रोग आहे.गव्हाच्या ओंब्या आणि दाने काळे पडतात.
त्याच्या मासळीच्या वासासारखा अतिशय घाणरडा वास येतो. त्यामुळे असा गहू खाण्यास योग्य राहतच नाही. उत्तर भारतात याचे प्रमाण जास्त आहे. आपल्याकडे अजुन नाही.
निरोगी गहू उत्पादनासाठी नुकसानकारक अशा या रोगाचे निर्मूलन करावे आणि अपेक्षित उत्पादन मिळवावे.
संदर्भ - प्रल्हाद यादव (कृषी प्रवचने )
अंतिम सुधारित : 5/28/2020
रोपवाटीकेतील रोपांवर हा रोग येतो. या रोगाची लक्षणे...
कपाशी पिकावर अणुजीवी करपा, दहिया, पानावरील विविध ब...
करपा : वनस्पतींची कोवळी पाने, फुले व नवीन वाढणारे ...
सध्या डाळिंब उत्पादक पट्ट्यात बागांमध्ये मर रोगाचा...