१) मर रोग: रोपवाटीकेतील रोपांवर हा रोग येतो. या रोगाची लक्षणे म्हणजे रोपे कोमेजतात व कोलमडल्यासारखी दिसतात. यासाठी बियाणे पेरताना थायरम या औषधाची बीजप्रक्रिया करून घ्यावी. रोपे मरगळल्यासारखी वाटत असतील तर २५ ग्राम कॉपर ऑक्सिक्लोराइड / १० लिटर पाण्यात मिसळून रोपांना अळवणी घालावी आणि फवारणी करावी. रोपवाटीकेतील पाण्याचा निचरा करून घ्यावा.
२) पानावरील करपा: पानावर तपकिरी काळे डाग पडतात. त्यासाठी ३५ ग्राम डायथेन एम-४५ हे औषध १५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. आठवड्याच्या अंतराने २-३ वेळा फवारणी करावी. नत्राची आवश्यक इतकीच मात्र देणे. शेत नेहमी तण विरहित ठेवावे. रोगग्रस्त पाने, झाडाच्या बुडाकडील वाळलेली पाने काढून झाड स्वच्छ ठेवावे.
३) फळावरील चट्टे: हा रोग दमात हवामानात येतो. कवळ्या फळांवर उंचवट्यासारखे गोल खरबरीत काळसर तपकिरी चट्टे पडतात. त्यासाठी Streptocycline/६ ग्राम १५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. ३५ ग्राम कॉपर ऑक्सिक्लोराइड /१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
४) भुरी: पानावर पांढरी पावडर पद्लाय्सारखे दिसते. नंतर पाने पिवळी पडून वळतात. त्यासाठी थायोव्हीट ३० ग्राम/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. डायनोकॅप ६ मिली/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
५) विषाणूजन्य रोग: हा रोग होऊ नये यासाठी प्रथमतः ज्या किडीद्वारे याचा प्रसार होतो म्हणजे, फुलीकीडे, तुडतुडे, मावा इ. चा वेळीच बंदोबस्त करावा. त्यासाठी शेतामध्ये पिवळे चिकट बोर्ड लावावेत (हेक्टरी १२). रोपवाटिका नेटमध्ये करावी. तसेच ५% निंबोळी अर्काची फवारणी करावी. इमिडाक्लोप्रिड ६ मिली किंवा डायमिथोएट १५ मिली/१५ लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
स्त्रोत: बळीराजा
अंतिम सुधारित : 7/27/2020
ढगाळ हवामानामुळे मावा किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची...
अॅडिसन रोग : (बाह्यकज-प्रवर्तक-न्यूनता). अधिवृक्क...
तोंडामध्ये आकडे असलेल्या परजीवी कृमीला ‘अंकुशकृमी...
अमिबिक यकृत फोड हा आंतड्यातील परजीवी एन्टामिबा हिस...