- गवती चहाची लागवड वर्षभर करता येते.
- लागवडीसाठी मध्यम काळी, पोयट्याची जमीन निवडावी.
- लागवडीपूर्वी जमिनीत पुरेसे शेणखत मिसळावे.
- लागवडीसाठी ओडी-440, सीकेपी-25, आरआरएल-16 या जातींची निवड करावी.
- लागवड 75 सें.मी. बाय. 75 सें.मी. अंतराने करावी. हेक्टरी 22 हजार ठोंब लागतात.
- लागवडीनंतर पाच महिन्यांनी पहिली कापणी करावी.
- त्यानंतरची कापणी दर तीन महिन्यांनी करावी.
- पहिल्या दोन वर्षांत हेक्टरी 20 टन ओल्या गवताचे उत्पादन मिळते.
- गवती चहाच्या तेलामध्ये सिट्रॉलचे प्रमाण 75 टक्के असते.
- यामध्ये जीवनसत्त्व अ मोठ्या प्रमाणात असते.
- तेल रंगाने पिवळसर असून, त्याला लिंबासारखा वास असतो.
संपर्क - 02426-243292
औषधी व सुगंधी वनस्पती योजना,
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी.
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या
तार्यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.
© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.