অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

तलाव - वर्षा जलसंचय

तलाव - वर्षा जलसंचय

समस्या

छोटा नागपूरचा विस्तार पश्चिम बंगालच्या पश्चिमे पर्यंत आहे. येथे भूभाग लाटांसारखा उंचसखल आहे. डोंगरमाथे पूर्णपणे भकास किंवा कोणत्याही झाडांविना दिसतात. येथील जमीन खडकाळ व दगडी असून ती पाणी धरून ठेवत नाही. वार्षिक पाऊस १२०० ते १४०० मिमि पर्यंत असतो. पण हा पाऊस फक्त वर्षातून २ महिनेच पडतो. बाकीचे महिने पूर्णपणे कोरडे असतात ज्यामुळे जमीन नापीक झाल्यासारखी परिस्थिती निर्माण होते. पूर्ण अर्ध-शुष्क क्षेत्रात एकाच प्रकारचे पीक येते जे देखील पावसावर अवलंबून असते. पावसाळ्यानंतर पाणी नसल्याने ८-९ महिने तरी कोणतेही पीक नसते. केवळ पावसाळी पिकावरदेखील अनियमित हवामानाचा वाईट परिणाम होतो आहे.
जास्तीत जास्त जमीन त्यामुळेच वापरात येत नाही व अशीच पडून राहते. अन्नाच्या कमतरतेमुळे तेथील लोकांना दुस-या जागांवर किंवा शेजारच्या राज्यांमध्ये कामासाठी स्थलांतर करण्यास भाग पडते.

खडकाळ जमीन असल्याने पाणी मुरत नाही आणि त्यामुळे तळी सांभाळणे देखील अवघड असते. तळी उथळ असतात आणि त्यात हवे तेवढे पावसाचे पाणी पावसाळ्यानंतर वापरण्यास साठू शकत नाही. विहिरी देखील कोरड्या पडतात. काही नद्यांना १०-१२ महिने पाणी राहते, पण या गरिब बिचा-या अदिवासींकडे हे पाणी या दुष्काळी वेळात वापरण्यासाठी साधने नाहीत किंवा तेवढा विचार करण्याची बुद्धी देखील नाही.

बदल

  • शेतक-यांचे छोटे छोटे समूह करण्यात आले आणि त्यांना जमिनीत नवीन तळी खोदण्यास व असलेल्या तळ्यांना अजून खोल करण्यास प्रवृत्त करण्यात आले. प्रत्येक तळे हे ३-४ स्तरांच्या रचनेत तयार करण्यात आले. चारी बाजूने तळ्याच्या मध्यात पोहोचण्याकरीता ३-४ रुंद पाय-या काढण्यात आल्या. ह्या पाय-या पावसाळ्यात पाण्यात बुडतात. तळ्यात पावसाचे पाणी थेट न जाता ते नाल्यांच्या माध्यामातून जाईल अशी व्यवस्था करण्यात आली. नाल्यांच्या किना-यांवर चारी बाजूला वेलीभाज्या लावण्यात आल्या, उदा. भोपळा, दुधी, कारली इ. कोरड्या महिन्यांमध्ये, जेव्हा पाण्याची पातळी खाली जाते तेव्हा, रुंद पाय-यांवर भाज्यांची लागवड करण्यात येते. आणि तळ्याच्या किना-यांचा वापर चवळीसारखे धान्य आणि ऋतू प्रमाणे भाज्या, इतर पिके किंवा मिश्र पिके घेण्यासाठी केला जातो. तळ्यातल्या पाण्यात वाढणारे मासे हे आणखी एक उत्पन्न होऊ लागले. तळ्यातील पाणी काठावर लावलेल्या भाज्या व पिकांना पाणी पुरवठ्यासाठी वापरले जाते. पाय-यांवर, तळ्या काठी आणि शेतांमध्ये सेंद्रीय पद्धतीने लागवड केली जाते. तळी खोदण्याचे काम, पाय-यांचे काम असे शेतक-यांच्या गरजा भागविण्यासाठी प्रत्येक समूहाला तळी वाटून दिली जातात. आणि त्यातून उरलेला वाटा ह्या समूहात नसलेल्या इतर गांवक-यांमध्ये विनामूल्य वाटला जातो. या नंतर आलेले उत्पन्न बाजारात विकण्यात येते व समूहाच्या सामूहिक बँक खात्यात जमा करण्यात येते.
  • अशी व्यवस्था केली जाते की जमिनीचा मालक त्याच्या जमिनीचा नापीक तुकडा छोट्या शेतक-यांच्या समूहाला कोरड्या काळात लागवडीकरता देतो. एक अगदी स्वस्त असे यंत्र नदीतून शेतापर्यंत पाणी पोहोचविण्यासाठी तयार करण्यात आले आहे.
  • तळी ही साधारणतः १.२ एकरात; १८० फूट X १६० फूट X १० फूट असतात.
  • ज्यावर तळी खोदली जातात ती जमीन ५ लोकांची असते व ती भाडे तत्वावर तीस  शेतक-यांना दिली जाते. भाड्याचा काळ संपला की ती जमीन पुन्हा मालकाच्या स्वाधीन केली जाते मात्र त्या तळ्याचे पाणी शेतक-यांच्या समूहाला वापरता येते.

परिणाम

  1. आता पर्यंत नापीक असलेली जमीन आता नैसर्गिक पद्धतीने चारा, इंधन व अन्नपदार्थ ऊगवून कामास येऊ लागली.
  2. लोकांना काम मिळाल्याने त्यांच्या स्थलांतराचे प्रमाण कमी होऊन गावक-यांची संख्या वाढीला लागली. २९७९ लोक तळ्याच्या कामासाठी राबू लागले आणि ८३१ लोक नापीक जमिनीवर पीक घेण्यासाठी.
  3. मातीची सुपीकता वाढली.
  4. कुटुंबाला पौष्टिक अन्नाचा पुरवढा वर्षभर चालू राहील अशी लोकांना खात्री पटली. तळी खोदण्याच्या कामाव्यतिरिक्त त्यांच्यात १० एकराची नापीक जमीन उपसण्याची देखील क्षमता आहे. २००६ मध्ये, मिश्र शेती पद्धतीने ४० प्रकारच्या वेगवेगळ्या भाज्यांचे पीक घेण्यात आले.
  5. उरलेल्या मालाच्या विक्रीमुळे त्यांच्या मिळकतीत वाढ झाली, आणि त्यांना देखील माल पुरुन उरु लागला.

 

स्त्रोत: डीआरसीएससी,कोलकाता

अंतिम सुधारित : 10/7/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate