१) २ लिटर क्षमतेच्या प्लास्टिकच्या वाया गेलेल्या बाटल्या आडव्या म्हणजे लांबीच्या दिशेत कापून रोपवाटिकेत भाताची रोपं करण्यासाठी वाफा म्हणून वापरल्या जातात.
२) ह्या अर्ध्या कापलेल्या बाटल्यांमध्ये गाळ, गांडूळखत आणि खाचरामधलं तूस ३:२:१ ह्या प्रमाणात भरलं जातं. अशा एका (म्हणजे अर्ध्या) बाटलीसाठी हे साहित्य सुमारे ३०० ग्रॅम लागतं.
३) अमृतपाणी किंवा बीजामृताची प्रक्रिया केलेले बियाणे ह्या बाटलीत बनवलेल्या वाफ्यात लावले जाते. अशा प्रत्येक वाफ्यात १० ग्रॅम बिया पेरल्या जातात.
४) दर दोन दिवसांने पाणी देऊन ह्या वाफ्यांमध्ये ओलावा कायम ठेवला जातो.
५) शेतामध्ये पुर्नपेरणी करण्यासाठी १० दिवसांत ही रोपटी पेरणी योग्य बनतात.
स्रोत: लागवडीच्या सेंद्रीय पद्धती
फूड अॅँड अॅग्रिकल्चरल ऑर्गनायझेशन, नवी दिल्ली आणि
नॅशनल सेंटर फॉर ऑर्गॅनिक फार्मिंग, गाझियाबाद
ह्यांचा तांत्रिक सहकार्यात्मक प्रकल्प
निर्मिती - महाराष्ट्र ऑर्गॅनिक फार्मिंग फेडरेशन (मॉफ), श्री. संजय पाटील, जव्हार तालुका, ठाणे
अंतिम सुधारित : 10/7/2020
मनीषा व देवनाथ जाधव या दांपत्याने तुती लागवड आणि र...
कपाशीत सापळा पीक म्हणून वापर होणाऱ्या अंबाडी पिकाप...
नगर जिल्ह्यातील बलभीम पठारे यांना पारंपरिक पीक पद्...
प्रगतिशील शेतकरी कुलदीप राजाराम राऊत यांनी विदर्भा...