गौण पिके सकस अन्न देणारी, कणखर आणि हवामान, बदला संवेदनक्षम असतात. गेल्या काही वर्षांपासून एकपीक पध्द्वती व सम्रन शेतीवर भर दिल्यामुळे हया पिकारखालील क्षेत्र घटू लागले आहे. कंधमाल येथील आदिवासी जमातींनी एकपीक पद्धतीचे बंधन तोडून गौण तृणधान्यावर आधारीत जैवविविधतेची शेती पध्द्वती अवलंबली आहे. सध्या ते जादा संवेदनक्षम आणि पर्यावरण सुलभ शेतीचा अवलंब करुन जादा प्रमाणात आणि अधिक सकस अन्न धान्य उत्पादीत करीत आहेत ते ही जैवविविधता सांभाळून
कुटीया कोंध ही आदिवासी जमात मुख्यत्वेकरुन ओडीसामधील कंधमाल जिल्हयाच्या तुमुदीबंध तहसिलीच्या सभोवतालच्या खेडयामध्ये राहते. दिर्घकालीन व दुरवर पसरलेल्या गरिबीने माखलेली कुटीया कोष्धं जमात टेकडयांच्या उतारावर (स्थानिक पोदुचासा नावाने ओळखतात) कोरडवाहु शेती आणि स्थलांतरीत शेतीवर त्यांचे उदरनिर्वाह करतात. ते जंगलावर सुध्दा अवलंबुन असतात आणि जवळपास 15% वार्षिक उत्पन्न. हे जंगलातील गौण उपज गोळा करून त्यातून मिळवतात.
कुटीया कोंध जमातीजवळ मिश्र पीक पध्दतीचा भरघोस अनुभव आहे. ते मिश्र शेतीत 40-50 प्रजाती व पीकांची लागवड करतात.ही पध्दती 20-25 वर्षअगोदर सर्वत्र अस्थित्वात होती हरितक्रांतीच्या तंत्रज्ञानाच्या आधारे शासनाने धन लागवडीवर जबरदस्त प्रोत्साहन दिल्यानंतर शेतातील जैवविविधता , ज्यामध्ये गौण तृणधान्य व कडधान्य होते ते नाहीसे व्हावयास लागले. तसेच स्वस्त धान्य वितरण योजनेमध्ये सुध्दा तांदूळ प्रमुख धान्य झाल्यामुळे शेतकरी धान तार्दुळ लागवडीकडे वळले. त्यामुळे इतर अन्न धान्याची निर्मिती घटली. सध्या परिस्थितीत फक्त 12-13 प्रकारच्य़ा पिकांची हया प्रदेशात लागवड केली जाते.
स्थानिक जमातींना वर्षातील 200-210 दिवसासाठी आवश्यक लागणारे अन्नधान्य जबरदस्तीने विकत घ्यावे लागते. त्यामुळे त्यांना अन्नधान्याच्या आवश्यकतेसाठी स्थानिक सावकार आणि इतर स्त्रोतांवर अवलंबुन राहावे लागते. सर्वसाधारणपणे सरासरी प्रत्येक कुटुंबावर रु 2800 चे कर्ज आहे. मुख्यतः अज्ञाची खरेदी करण्यासाठी कर्ज घेतले जाते. त्याकरीता मातीमोल किंमतीत शेतीचा तुकडा (धान शेतीचा) जनावरे, परीपक्व फळांचे वृक्ष (जसे आंबा, फणस इ.) किंवा हळद व मोहरी . सारखी पीके गहाण ठेवावी लागत.
गुमा गावात सन 2011 मध्ये निर्माण या स्वंयसेवी संस्थेने गौण तृणधान्यावर अभ्यास केला. निर्माण ह्या संस्थेने 2011 पासून कंधमाल भागातील गौण तृणधान्यावर आधारीत पीक पध्दतीवर काम करत शाश्वत शेती , जैविक विविधतेचे संवर्धन आणि ग्रामीण उदरनिर्वाह या बार्बीवर कार्य सुरू केले. अभ्यासाओंती असे निर्दशनास आले की गौण तृणधान्यावर आधारीत पीक पध्दतीची लागवड क्षेत्रात घट झाली असून त्याचा परिणाम कौटुंबिक अन्न व आहाराच्या सुरक्षितेवर झाला आहे. निर्माणाने सखोल तपासणी केल्यानंतर असे आढळले की, गौण तृणधान्य पिके वाढत्या तापमानात व कमी आर्दतेत तग धरण्यास सक्षम असून सकस अन उत्पादित करते म्हणुन निर्माणने गौण तृणधान्य पिक पद्धती पुनर्स्थापन पुनरआगमनानंतर पिकांची विविधता १३ वरून २५ वर गेली तसेच कुटुंबाची अन्न सुरक्षा ४५ वरून ६० दिवसांवर गेली एकाच हंगामात अपुऱ्या बियांनापासून हि जमत बियानामध्ये स्वावलंबी झाली.
भरह धान्ये कणखर व पाण्याचा ताण सहन करणारी असतात .तृणधान्य पद्धती पुन्हा कार्यान्वित होण्यासाठी शेतकर्यांना प्रोत्साहन दिले त्यासाठी शेतकरयाची संघटना निर्माण करून धोरण पातळीवरील बदलांसाठी प्रभाव टाकणे सुरु केले.
निर्माणने 14 खेड़यातील 306 कुटुंबासोबत गाव बैठकी घेतल्या. अन्न व पोषणाची असुरक्षितता यासारख्या मुद्यावर आणि शेती पध्दतीत होणारा बदल याबाबत जमातीसोबत सांगोपांग चर्चा केली. त्यामुळे या जमातीला गौण तृणधान्य आधारीत शेती पध्दतीचे पुर्नजिवन करण्याची गरज भासू लागली. यामध्ये निर्माण मध्यस्थीचा मुख्य उद्देश होता की ग्रामीण स्तरावरील घटकांना अन्न उत्पादन यंत्रणेचा हक्क / ताबा मिळवणे सोपे गेले पाहिजे आणि चांगल्या राहणीमानासाठी बियाणे पतपेढी उभारणे, ज्ञानाची देवाणघेवाण होण्यासाठी अभ्यास वर्ग व सहली आयोजीत करणे. तसेच गौण तृणधान्य आधारीत शेती पद्धतीचे पुनर्जीवन करणे . प्रत्येक खेड्यात ग्रामीण स्तरावरील संघटना उभी केली. ती संस्था जमातीला किंती बियाणे लागेल यांचा अंदाज घेऊन ते जमा करेल. या ग्रामीण संघटना गौण तृणधान्याच्या बियाणाच्या पतपेढी आणि त्याचे व्यवस्थापन करू लागल्या.
खुल्या संकरण होणारया वानांवर भर देऊन विशेषता: महीला शेतक-याकडून बीज पैदास करण्यात आले. जमातीच्या गटांनी गौण तृणधान्य व कडधान्यांच्या बियाणांच्या आवश्यकतेचा आढावा घेतला. प्रारंभी निर्माणने 12 वाणांच्या बियाणांचा पुरवठा केला. नंतर हे बियाणे ग्रामस्तरावरील गटांना भांडवल म्हणून बियाणे पतपेढीकरिता वितरीत करून त्यांची वाढ करणे आणि जमातीच्या बियाणांची आवश्यकता पुर्ण केली जाईल अशी त्यांच्यावर जबाबदारी दिली. हा कार्यक्रम राबविण्यासाठी स्त्रियांच्या बियाणे निवड़णे व संग्रह करण्याच्या ज्ञानाचा वापर करुन महत्वाची भुमिका त्यांना दिली बियाणांची निवड ,कुटुंबाची आवशकता ,बियाणांची महिलांनी किंमत ठरविणे, जमा करणे आणि कुटुंबामध्ये वितरण करण्याच्या कामात महिलांनि अग्रक्रमाणे भाग घेतला . गाव स्तरावरील गटांच्या बैठकीत जमातीने महिलांना कार्यालयीन अधिकारी जसे अध्यक्ष व सचिव म्हणून निवडले. एकाच हंगामात जवळपास 25 पिकांच्या वाणांचे पुनरुज्जीवन झाले. याप्रमाणे लागवडीचे वेळापत्रक वाढत गेले आणि जमातीला अधिक उत्पादन मिळावयास लागले. अशा पध्दतीने सरतेशेवटी कौटुंबिक स्तरावर अन्न सुरक्षितता वाढत गेली,
पिकाच्या कापणीनंतर कुटीया कोंध हि जमात गावपातळीवर बुरलांग यात्रा उत्सव म्हणून साजरा करते. निर्माणने या उत्सवाला गावपातळीवर मदत केली. विविध खेडयामधील लोंकामध्ये एकजुट निर्माण होण्यासाठी प्रथमच ग्राम पंचायतीच्या स्तरावर बुरलांग यात्रा आयोजीत करण्यात आली. या उत्सवाचा उपयोग शेतातील जैवविविधतेचे पुनरुज्जीवन करण्याची संधी, स्थानिक बीयाणे शेती पध्दती आणि त्यांच्या जीवनमानाचे प्रदर्शन इ.साठी करण्यात आला. जमातीकडून स्थानीक बियाण्यांचे संवर्धन, शेती पध्दती आणि पीक वैविधता कशी अन्न व पोषण सुरक्षीतत सुधारता येऊ शकते याचे प्रमाणीक पणे प्रदर्शन केले . बियाणे प्रदर्शनात जमातीकडून लागवड केलेल्या गौण तृणधान्य , कडधान्य ,धान , गळीत धान्य आणि भाजीपाला इ. चा समावेश होता . त्यात बियाणांची , अनुभवाची आणि कृषीपद्धतीच्या ज्ञानाची देवाणघेवाण झाली त्या उत्सवात राज्यातील इतर भागातील तसेच शेजारच्या राज्यातील जसे आंध्रप्रदेशातील शेतकऱ्याना भाग घेतला . गुमा ग्रामपंचायतीतील शेतकऱ्यांनी गौण तृणधान्य मिश्रीत पीक पध्दतीने कसे अन्न व पोषणाची सुरक्षा प्राप्त केली याचा भरपुर अनुभव इतराना सांगितला. या जमातीने ही संधी संबंधीत जनमानसाच्या विचारसरणीवर प्रभाव टाकण्यासाठी उपयोगात आणली. शाळेतील व आंगणवाडीतील दुपारच्या जेवणात सर्वांना गौण तृणधान्य अत्यंत आवश्यक आहे याची जाणीव करुन दिली.
गौण तृणधान्यावर आधारीत शेती पध्दतीमुळे 14 खेडयातील शेतात पीक विविधता 13 वरुन 25 वर पोहोचली आणी अन्नाच्या विविधतेमध्ये वाढ झाली. कौटुंबिक पातळीवर 45 ते 60 दिवसापर्यंत अन्नाची सुरक्षितता वाढली. एकाच हंगामात बीयाणाची कमतरता भासणारी ही जमात बियाणांच्या बाबतीत स्वावलंबी झाली महत्वाची बाब म्हणजे पिकाच्या विविधतेच्या ऱ्हासासोबत वाहून गेलेले परंपरागत ज्ञान पुनर्स्थापित झाले. भविष्यात सहभागीय हमी पद्धतीअंतर्गत सेंद्रिय प्रमाणिक करण मूल्यवर्धन बाजारसाकळी आणि महिला सक्षमीकरण यांच्या एकात्मिकरीत्या अंमलासाठी योजना तयार केली आहे. मानवी व पर्यावरणाच्या आरोग्यावर विविध अंगी चांगला परिणाम होण्यासाठी सुध्दा गौण तृणधान्य आधारीत शेती पध्दतीचा विस्तार असे विशेष प्रयत्न करण्यात आले. प्रसाराचे साहीत्य निर्माण करुन वितरण करण्यात आले.
गौण तृणधान्य व पीक विविधता याचेवर भर देणारी कृषक समाज या नावाची वृत्तपत्रिका सुरु करण्यात आली. निर्माणने तयार केलेल्या मॉडेलद्वारे आज शेतीविषयक अडचणी सोडवणुकीचे सूत्र देऊन कंदमाल जिल्ह्यातील समउष्ण प्रदेशातील जमातीच्या अन्न व पोषणाची आवश्यकता पुर्ण होऊ शकली असा पर्याय दिला. हस्रा मॉडेल मध्ये असमतोल पाऊसमान व हवामान बदलाला आत्मसात करण्याची ताकद असुन शेती पध्दती पुर्ववत होण्यास सक्षमता वाढीस लागली. दुस-या वर्षी या प्रयोगाचा विस्तार 37 खेडयातील 445 कुटुंबापर्यंत वाढविण्यात आला . अंगणवाडीतील मध्यान्न भोजनात गौण तृणधान्याचा समावेश करण्यात प्रयत्न करण्याचा आला. सरकारी अधिकान्यांसोबत, विचारवंतासोबत आणि प्रसार माध्यमासोबत कृतीशील राहून ध्येय साधण्यासाठी प्रयत्न सुरु केले.
स्त्रोत - लीजा इंडिया
अंतिम सुधारित : 10/7/2020
दुर्जल शेतीसाठी सर्वांत चिवट असे हे गरीब लोकांचे ब...
गहू पिकाविषयी अधिक माहिती - गहू हे भारतातील महत्...
दररोज वापरात येणाऱ्या तृणधान्यांमधून आपणाला एकूण उ...
अनेक ठिकाणी गहू पीक आता फुलोरा ते काढणीच्या स्थिती...