माझे नाव शिवाजी सुखदेव शिंदे, रा. एकांबा, वय ५० वर्षे,व्यवसाय सुरूवातीला रोजमजुरी करत होतो. अशा परिस्थितीत गावातील व्यक्ती यांच्याकडुन १० टक्के व्याज दराने ३००० रू. कर्ज रक्कम घेवुन ११ कोंबडया व १ कोबंडा असे १२ नग ३००० रूपयात खरेदी करून व्यवसायाला सुरूवात केली.
१५.२.२०१३ ला नाबार्ड संचालित सर्वांगीण पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रमा अंतर्गत पशुपालन कार्यक्रमातून ६०० रूपयाचा सहभाग भरून सावित्री ज्योतीराव फुले पाणलोट समिती एकांबा कडून ३००० रू मिळाले. या रकमेतुन ११ कोबडया व १ कोंबडा एकुण १२ नग खरेदी केली. या कोबडयांना खाण्याकरीता २५ किलो गहू, व २५ किलो तांदुळ एक महिन्याचे खाद्य म्हणून घेतो. तसेच महिन्यामध्ये २५० रूपये औषधी यावर खर्च होतो. अशाप्रकारे महिण्याला ९८० रूपये खर्च करतो. त्याच बरोबर उन्हाळयाच्या दिवसामध्ये गरम हवे पासून संरक्षण होण्याकरिता शेतालगतच पाणी वाहून नेणारी नाली आहे. या नालीवर तराटे, पराटी टाकुन नाली झाकून ठेवल्या जाते. यामुळे उन्हाळयाच्या दिवसात थंड वातावरण निर्मिती होते. उन्हाळयामध्ये गरम हवेपासून रक्षण होण्याकरिता या नाल्याच्या ओलाव्यामुळे कोंबडया नालीच्या बसतात.
आज या कोंबडयापासून प्रति दिवस १० अंडी मिळतात. प्रति अंडी १० रूपये १०० रू रूपये दररोज मिळतात. ७ ते ८ महिण्यामध्ये पशुखाद्य व औषधी खर्च होता २०००० रूपये नगदी नफा झालेला आहे. आजच्या घडीला २०००० रूपये किमंतीच्या कोंबडयांचे पशुधन आहे. आज माझ्या जवळ छोटी - मोठी एकुण ७५ नग आहे. आज मला चांगल्या प्रकारे रोजगार मिळाला आहे या उपक्रमासाठी अर्थ सहाय्य दिल्याबद्दल नाबार्ड कार्यक्रमाचा आभारी आहे.
आशय लेखक : महेश शेळके (वर्धा)
अंतिम सुधारित : 8/16/2020
नगर जिल्ह्यातील बलभीम पठारे यांना पारंपरिक पीक पद्...
मनीषा व देवनाथ जाधव या दांपत्याने तुती लागवड आणि र...
प्रगतिशील शेतकरी कुलदीप राजाराम राऊत यांनी विदर्भा...
कपाशीत सापळा पीक म्हणून वापर होणाऱ्या अंबाडी पिकाप...