1) मी 3 जून रोजी एक एकर द्राक्षखुंट लागवडीच्या क्षेत्रामध्ये आंतरपीक म्हणून काकडी लागवड केली होती. काकडीचे पीक आता चांगले वाढीच्या अवस्थेत असून, त्याचे आतापर्यंत 16 तोडे झाले आहेत. एक दिवसाआड तोडा सुरू आहे. आतापर्यंत 150 क्रेट (20 किलोचा एक क्रेट) उत्पादन झाले आहे. नाशिक बाजारपेठेत प्रति क्रेट 650 रुपये दर मिळाला.
2) काकडीच्या दर्जेदार उत्पादनासाठी खत व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. पहिल्यांदा मी ठिबकमधून 19-19-19 हे खत देत होतो. आता शेंड्याचा वाढीचा जोर जास्त असल्याने हे खत देणे बंद केले आहे. सध्या दर तीन दिवसांआड 12-61-0 पाच किलो प्रति एकरी देत होता. यामुळे फळाची फुगवण चांगली आहे. अजून 15 दिवस काकडी चालेल.
3) कीड नियंत्रणासाठी एकरी 15 चिकट सापळे लावले आहेत. कृषितज्ज्ञांच्या सल्ल्याने कीडनाशाकांची फवारणी घेतो. वेली चांगल्या पद्धतीने बांधल्या आहेत. वेलीची गर्दी कमी ठेवली आहे, त्यामुळे शेतात हवा खेळती रहाते. फळांची वाढ चांगली होते. हिरवेपणा वाढतो. त्यामुळे व्यापाऱ्यांच्याकडून काकडीला वाढती मागणी आहे. शेतात वेलीची गर्दी झाली तर काकडी पांढरी पडते. वाढ योग्य होत नाही. बाजारपेठेत अशा काकडीला दर कमी मिळतो.
1) जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात एक एकर दोडका लागवड केली होती. पीक चांगले वाढीच्या अवस्थेत आहे. सध्या दर तीन दिवसांनी तोडणी सुरू आहे. आतापर्यंत 10 तोडे झाले आहेत.
2) एका तोड्यात 10 क्रेट (10 किलोचा एक क्रेट) उत्पादन मिळते. सरासरी प्रति क्रेट दर 650 रुपये मिळाला आहे.
संपर्क - 9552215712
साहेबराव नामदेवराव गवळी,
विंचुरगवळी, जि. नाशिक.
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
वर्धा येथील अभियंता विनोद राजगुरे हीच अंबाडी शेतकऱ...
कपाशीत सापळा पीक म्हणून वापर होणाऱ्या अंबाडी पिकाप...
मनीषा व देवनाथ जाधव या दांपत्याने तुती लागवड आणि र...
प्रगतिशील शेतकरी कुलदीप राजाराम राऊत यांनी विदर्भा...