অসমীয়া   বাংলা   बोड़ो   डोगरी   ગુજરાતી   ಕನ್ನಡ   كأشُر   कोंकणी   संथाली   মনিপুরি   नेपाली   ଓରିୟା   ਪੰਜਾਬੀ   संस्कृत   தமிழ்  తెలుగు   ردو

महाराष्ट्रातील मेंढयाच्या जाती

महाराष्ट्रातील मेंढयाच्या जाती

डेक्कनी मेंढी


शारिरीक गुण वैशिष्टये.

रंग - हया मेंढयांमध्ये काळा (57%) पांढरा (28%) आणि काळा पांढरा, मिश्र रंग (15%) तपकिरी असा आढळतात.

वजने- दख्खनी मेंढया मध्यम प्रकारच्या मेंढया असून त्यांची वजने आणि शारीरीक प्रमाणके खालीलप्रमाणे

प्रौढ नर

प्रौढ मादया

 

अ) वजन किं

३८.४८+१.०६

२८.५८ ०.११

ब) लांबी (सेमी)

६७.८८ ०.६९

६५.२१ ०.१०

क) उंची (सेमी)

६७.४४ ०.७१

६३.७९ ०.०९

ड) छातीचा घेर

७७.९६ ०८७

७०.७५ ०.१०

पैदास - मेंढपाळांच्या कळपामध्ये करडे जन्माचे प्रमाण ७५.२ %

उत्पादनः-
मांस उत्पादन - कत्तलीचे वय सहा महिने आणि मांसाचा उतारा ४९.६+१८%

लोकर उत्पादन
सरासरी प्रति पैकी लोकर उत्पादन ५८७ ग्रॅम्स 
लांबी (सेमी) ८.५८ ०.३२ 
धाग्याची तलमता (मासक्राँन) ५२.४२ १.८६ 
केसांचे प्रमाण (%) ७३.७५ २.५४

लोकर केसांची घनता (प्रति चौ. से मी) ७३४.४६ २८.९०

 

 




माडग्याळ मेंढी


शारिरीक गुण वैशिष्टये.
रंग - हया मेंढयांमध्ये प्रामुख्याने पांढरा आणि त्यावर तपकिरी मोठे ठिपके आढळतात आणि हे माडग्याळ मेंढयांचे खास वैशिष्टये आहे.

 

नाक - हठक पोपटासारखे बर्हिवक्र नाक हे हया जातीचे दुसरे वैशिष्टय आहे.

शिंगे - दोन्ही लिंगामध्ये शिंगे आढळून येत नाहीत.

उंची - प्रौढ मेंढेनराची सरासरी उंची खादयांपर्यन्त ८० से.मी. (३२ इंच) ते ८८ सें.मी. (३५ इंच) तर प्रौढ मेंढयांमध्ये ६३ से.मी. (२५ इंच) ते ७५ सें.मी. (३० इंच) आढळते.

मान - प्रौढ मेंढेनरामध्ये ४५ सें.मी. (१८ इंच) ते ५३ सें.मी. (२१ इंच) तर प्रौढ मेंढयांमध्ये ३० सें.मी. (१२ इंच) आढळते. 
शेपटाची सरासरी लांबी १७ ते २० सें.मी.

१. जुळयाचे प्रमाणः अर्ध्या टक्क्यापेक्षा कमी 
२. लोकर - लोकर ही जाडी भरडी आणि सरासरी वार्षिक उत्पादन ते २५० ग्रॅम्स ते २६० ग्रॅम्स आढळते.

  • सरासरी वजनवाढीचा वेग २२५ ग्रॅम्स प्रतिदिन आढळतो.
  • दुध - कोकरापुरते दुध उपलब्ध असते.
  • प्रजनन क्षमता -
  • कालावधी - ९ ते १२ महिने
  • एकूण पैदाशीचा कालावधी - ७ ते ८ वर्षे
  • सर्वसाधारण जीवन - १४ ते १५ वर्षे कालावधी.
माडग्याळ मेंढयांचे स्थलांतर - चारा आणि पाण्याकरिता नजिकच्या ता.मंगळवेढा, जि. सोलापूर आणि जिल्हा विजापूर, कर्नाटक राज्यामध्ये स्थलांतरित होतात.

 

 

स्त्रोत : पशुसंवर्धन विभाग , महाराष्ट्र शासन

अंतिम सुधारित : 7/22/2020



© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.
English to Hindi Transliterate