उपलब्ध बारमाही अगर वाहत्या पाण्यात मत्स्यपालन आणि बदकपालन हि संकल्पना अगर प्रयोग माझ्यामते करून पाहायला पाहिजे. यशस्वी झाला तर दोन फायदेशीर व्यवसाय एकाच ठिकाणी अतिशय कमी मॅनेजमेंटमध्ये करता येऊ शकतील.
सध्या बदकपालन समुद्र किनारपट्टीलगत भातशेतीत केलं जाते. बदके पाळण्यासाठी कायमस्वरूपी पाणीसाठा असावा लागतो. लहान तळी, मोठी तळी, शेततळी, गावतळी, धरणं इ. ठिकाणी बदकपालन करता येऊ शकतं. बदकाचं मुख्य खाद्य म्हणजे भातशेतीतल्या गोगलगाई, तसेच अनेक प्रकारच्या किडी, पाण – वनस्पती, शेवाळ, पाण्यातील किडे, जीवजंतू, गांडुळे, कृमी, हिरव्या वनस्पती इ. बदके ज्वारी – बाजरीचे दाणे, कडधान्यांचे दाणेही खातात.
बदकाची जी वैशिष्ट्ये आहेत अगर त्यांची जी जीवनप्रणाली आहे ती व्यवसायाच्या दृष्टीने फायद्याचीच आहे. दक्षिणेत बदक व्यवसाय हा मेंढपाळीसारखा आहे.
बदकांच्या अंडी उत्पादनासाठी ऑरपिंगटन, खाकी कॅम्पेबल, इंडियन रनर, म्यॉग पाईन व्हाईट स्टॅनब्रिज या जाती असून खाकी कॅम्पेबल आणि इंडियन इंडियन रनर या दोन जाती आपल्याकडे जास्त प्रमाणात पाळतात. त्या वर्षाकाठी ३०० अंडी देतात, इतर जाती वर्षाकाठी १७५ ते २५० अंडी देतात. शोभेची बदके शोभिवंत, देखणी असून सोनेरी, लाल, जांभळी, निळी, काळी, पांढरी. पिवळी इ. छटायुक्त असतात. टील विडजन, पिनटेन, करोलिना शोव्हेलियर या जाती शोभिवंत बदकाच्या आहेत. बदक प्रजोत्पादनासाठी १० महिन्यांनी तयार होते. ५ – ६ महिन्यांनी झाली म्हणजे अंडी देतात. एक नर ४ – ५ माद्यांसाठी ठेवावा.
बदकांना मुबलक पाणी असावेच लागते. ६’ × ६’ × १.५’ च्या टाक्यात १० बदके पाळता येतात. पाण्याच्या उपलब्धतेजवळच बांबू, तुराट्या, तट्ट्याच्या साह्याने घर करता येतं. प्रत्येक बदकास २ चौ. फुट जागा पुरेशी होते. घराभोवती कंपाउंड करून मोकळी सोडवीत. कोंबड्यांच्या खाद्याप्रमाणे प्रथिनयुक्त उर्जायतुक्त राजे १२० ते १५० ग्रॅम खाद्य द्यावं. ७ आठवड्यांत ८ किलो खाद्य खाऊन २.५ किलो वजनाची बदके होतात. कोंबडीच्या पिलांप्रमाणे पिल्लांची जोपासना करावी. सुरुवातीला ३० सें. ग्रॅ. तापमान ठेवावे नंतर दर आठवड्याला ३.४ सें. ग्रॅ. नी तापमान कमी करीत जावे. सुरुवातीला प्रथिनं आणि उर्जा मिळवण्यासाठी खाद्य द्यावं. ते वय वाढीनुसार वाढवावे. चौथ्या आठवड्यांपासून पिल्लांना मोकळं सोडावं. पाणी सतत पाहिजेत नाही तर डोळ्यांचे विकार होतात.
स्त्रोत - कृषी प्रवचने, प्रल्हाद यादव
अंतिम सुधारित : 7/17/2020
करडांच्या शरीरस्वास्थ्य सुयोग्य राखण्यासाठी सकस आह...
जनावरांची उत्पादकता टिकवण्यासाठी, तसेच त्यांचे आरो...
शेळीपासून मांस, शिंगे व खुरे यांपासून डिंकासारखे प...
प्रसूतिपूर्व, विताना आणि विल्यानंतर होणारे कोकरांच...