ब्रिटिशांनी कापसाच्या खरेदीसाठी 1886 मध्ये हैदराबाद संस्थानच्या कायद्यानुसार स्थापन केलेली देशातील पहिली बाजार समिती म्हणून वाशीम जिल्ह्यातील कारंजा बाजार समिती ओळखली जाते. या बाजार समितीच्यावतीने भरविण्यात येणारा जनावरांचा बाजारही विदर्भात प्रसिद्ध आहे. 15 वर्षांपूर्वी सुरू करण्यात आलेला हा बाजार देशी बैलांसाठी ओळखला जातो.
ब्रिटिशांना कापड उत्पादनासाठी कापसाची आवश्यकता होती. योग्य अभ्यासानंतर कारं जासोबतच, अकोला, वाशीम इतरही भागांत ब्रिटिशांनी शेतकऱ्यांना कापूस लागवडीसाठी प्रोत्साहित केले. त्याकरिता शेतकऱ्यांना बियाणे उपलब्धता ब्रिटिशांनी करून दिल्याची नोंद बाजार समिती प्रशासनाकडे आहे. सध्याचा विदर्भ प्रांत पूर्वी मध्य प्रदेशाशी संलग्न होता. हा भाग "बेरार' नावाने ओळखला जात होता. शेतकऱ्यांकडून उत्पादित कापसाची खरेदी ब्रिटिश करीत होते. कापसाच्या खरेदी- विक्री व्यवहारासाठी सन 1886 मध्ये "हैदराबाद ऍक्ट'मधील तरतुदीचा अवलंब करीत कारंजा येथे देशातील पहिली बाजार समिती स्थापन करण्यात आली. सध्या या बाजार समितीचे सभापती आमदार प्रकाश डहाके तर उपसभापती केशव खोपे आहेत. बाजार समितीचे सचिव अशोक दहातोंडे (पाटील) आहेत. बाजार समितीत आजही हंगामात कापसाची व त्यासोबतच सोयाबीनची मोठी उलाढाल होते. त्याचबरोबरीने हा बाजार देशी बैलांसाठी प्रसिद्ध आहे.
बाजार समितीचे सचिव अशोक दहातोंडे (पाटील) बाजारपेठे संदर्भात माहिती देताना म्हणाले, की देशातील पहिली बाजार समिती म्हणून लौकीकप्राप्त कारंजा बाजार स मितीकडून गत पंधरा वर्षांपासून गुरांचा बाजारही भरविण्यात येत आहे. बाजार समितीच्या मालकीच्या औरंगाबाद-नागपूर महामार्गावरील सहा एकर परिसर क्षेत्रात हा बाजार भरतो. सुरवातीची काही वर्षे बाजार समितीकडून गुरांच्या बाजारातील कराची वसुली करण्यात येत होती. त्यानंतर लिलाव पद्धतीने वसुली करण्यात येते. या वर्षी कारंजा येथीलच एका व्यापाऱ्यास साडेपाच लाख रुपयांत बाजार विकण्यात आला आहे. नव्यानेच सुरू झालेल्या या बाजारात देशी बैलांचे मोठे व्यवहार होतात. त्यामुळे या ठिकाणी दर आठवड्याला हजारावर व्यापारी खरेदी- विक्रीसाठी येतात.
कारंजा पंचायत समितीचे पशुधन पर्यवेक्षक डॉ. सुनील महल्ले यांनी सांगितले, की या बाजारात गुजरातमधून मुऱ्हा म्हशी विक्रीस येतात. सरासरी 20-35 हजार रुपयांपर्यंत मुऱ्हा म्हैस मिळते. आठवड्याला सरासरी 50 म्हशी शेतकरी व व्यापाऱ्यांकडून विक्रीसाठी आणल्या जातात. त्यासोबतच अगदी कमी संख्येत देशी म्हशी देखील विक्रीसाठी येथे येतात. गावरान म्हशींची दूध उत्पादकता कमी असल्याने त्यांना दहा ते 15 हजार रुपये इतका दर मिळतो. येथील बाजारात देशी बैलांची खरेदी- विक्री मोठ्या प्रमाणात होते. बैलजोडीची किंमत साधारणपणे तीस हजारांपासून ते अगदी 85 हजार रुपयांपर्यंत होते. चार ते पाच वर्षे वयाच्या बैलजोडीकरिता 40 हजार रुपयांच्या पुढेच प ैसे मोजावे लागतात. देशी गाई देखील या बाजारात विक्रीसाठी येतात, परंतु त्यांची स ंख्या कमी आहे. दर आठवड्याला सरासरी 400 बैल, 60 म्हशी तसेच 300 पेक्षा अ धिक शेळ्या या बाजारात विक्रीसाठी येतात. कारंजा येथील गुरांचा बाजार अस्तित्वात येण्यापूर्वी जनावर खरेदीदारांची पसंती कामरगाव, उंबर्डा, शेलूबाजार येथील गुरांच्या बाजारांना होती. आज कारंजासोबतच त्या बाजारातील खरेदीदारांची संख्या वाढते आहे.
कारंजा तालुक्यातील कामरगाव, धनज, उंबर्डा बाजार, वाई, खेर्डा, भामदेवी, हिवरा लाहे, इंजा, धानोरा, मनभा, पोहा, दुगोरा, काजळेश्वर, खेर्डा बु., डंगारखेड, लोणी अरब, बां बर्डा, काकडशिवणी, भडशिवणी, पसरणी, धामणी, दोनद, ल्ीा, यावर्डी, येवता, वालई, शहा, जयपूर, साजनपूर, वडगाव, वडगाव (रंगे), शिवण, झोडगा, नारेगाव, आखतवाडा, शिवनगर, तुळजापूर, कामठवाडा, जांब, वहितखेड या गावांतील शेतकरी, व्यापाऱ्यांसह मानोरा, अमरावती, अकोला व यवतमाळ जिल्ह्यांतील दिग्रस, दारव्हा तसेच इतरही भागां तून खरेदीदार व शेतकरी येथे येत असल्याची माहिती बाजार समितीच्या सूत्रांनी दिली.
बाजार समितीकडून सुरवातीची काही वर्षे कर आकारणी होत असे. आता लिलाव पद्धतीने बाजार विक्री होते. या वर्षी साडेपाच लाख रुपयांत बाजार विकण्यात आला असून आता कंत्राटदाराकडून कराची आकारणी केली जाते. त्यानुसार लहान जनावरांच्या बैठकीकरिता दोन रुपये तर मोठ्या जनावरांसाठी पाच रुपये प्रति जनावर याप्रमाणे कर आकारणी होते. जनावरांच्या खरेदी- विक्री व्यवहारापोटी शेकडा दीड रुपया कराची आकारणी करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. बाजार समितीकडून वसूल करण्यात आलेल्या या रकमेतून शेतकरी तसेच जनावरांच्याही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली आहे.
बाजार परिसरात सावलीकरिता शेडची व्यवस्था नसली तरी दाट झाडी आहे. बाजार प रिसरात पुरेशी प्रकाश व्यवस्थाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. गुरांच्या बाजारात प्रस्तावित विकास कामांसाठी "एम.ए.सी.पी.'कडे अनुदानावरील रकमेचा प्रस्ताव पाठ विण्यात आला आहे. तब्बल एक कोटी रुपयांचा हा प्रस्ताव असून निधीची तरतूद होताच शेतकऱ्यांना या बाजारात विविध सुविधा उपलब्ध करून देणे शक्य होणार असल्याचे अशोक दहातोंडे यांनी सांगितले.
ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेले कारंजानृसिंह सरस्वती स्वामी महाराजांचे प्रसिद्ध धार्मिकस्थळ आणि वाशीम जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असलेले कारंजा जैन समाज बांधवांची काशी म्हणूनही ओळखले जाते. निजामकाळात शिवाजी महाराजांनी कारंजावर दोन वेळा स्वारी केल्याच्या ऐतिहा सिक नोंदी आहेत. शिक्षणाच्या बाबतीतही हा तालुका पुढारलेला म्हणून ओळखला जातो. ऐतिहासिक, धार्मिक व सांस्कृतिक वारसा जपलेले हे गाव नागपूर-जालना महामार्गावर आहे. वाशीम या जिल्ह्याच्या ठिकाणापासून कारंजा 65 किलोमीटर तर अकोल्यापासून 78 किलोमीटर अंतरावर आहे.
या बाजारात येणाऱ्या शेतकऱ्यांनी सांगितले, की बाहेरगावावरून येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी सोबत आणलेली शिदोरी खाण्यासाठी शिदोरी घर येथे नाही. त्यासोबतच पिण्याच्या पाण्याबाबतही बाजार समिती प्रशासनाचे उदासीन धोरण आहे. बाजार परिसरातील हनुमान मंदिराचा ओटा हाच एक स्वच्छ परिसर व बैठककामी उपयोगी येणारा भाग आहे. पावसाळ्यात सर्वत्र चिखल होतो. त्यामुळे बाजार समितीने शुद्ध पाण्याच्या व्यवस्थेसोबतच परिसरात कॉंक्रिटीकरण करावे.
-------------------------------------------------------------------------------------------
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
देशी जातींमध्ये असणारा काटकपणा, रोगप्रतिकारक शक्ती...
कोकणात साहिवाल गोवंशाचे संवर्धन करण्याबरोबरच तूपनि...
देशी गाय संगोपन प्रकल्प याविषयीची हि चित्रफित
गायीच्या जाती आणि त्यांची वैशिष्ट्ये भारतातील गायी...