प्रत्येक देशात जनावरे, शेळी - मेंढी, कोंबड्यांच्या जातींमध्ये विविधता आढळते. या देशी जातींमध्ये असणारा काटकपणा, रोगप्रतिकारक शक्ती हे गुणधर्म लक्षात घेता भविष्यातील संशोधनासाठी या जातींचा ठेवा जपण्याचे प्रयत्न जगभरात सुरू झाले आहेत. यासंदर्भात जागतिक अन्न आणि कृषी सं घटनेने (एफएओ) पुढाकार घेतला आहे. या संघटनेच्या पशुतज्ज्ञांनी देशी पशू-पक्ष्यांतील जातींच्या संवर्धनासंदर्भात प्रकल्प आखला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातूनही देशी जनावरांचा शास्त्रशुद्ध अभ्यास करण्यात येणार आहे.
गेल्या तीन वर्षांच्या प्रयत्नांनंतर सुमारे 191 देश या प्रकल्पामध्ये सहभागी झाले आहेत. विविध देशांतील जनावरांच्या जनुकांचा अभ्यास करून देशी जनावरांच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा घडवणे, शुद्ध वंश जपणे हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. सन 2007-08 पासून विविध देशांतील मा हितीवरून असे लक्षात येत आहे, की संबंधित देशातील देशी जनावरांच्या जाती दुर्लक्षामुळे नष्ट होत चालल्या आहेत, त्यामुळे महत्त्वाचा जनुकीय ठेवा आपण गमावत आहोत. जगभरातील देशी जनावरांची विविधता लक्षात घेता येत्या काही वर्षांत जवळपास 20 टक्के जाती लुप्त होण्याच्या मार्गावर आहेत, असे "एफएओ'च्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
या अहवालात असे म्हटले आहे, की जगाचा विचार करता कोंबडी, जनावरे, शेळ्या - मेंढ्या, पक्षी, शहामृग यांच्या सर्व्हेक्षणामध्ये सुमारे 1710 जाती धोक्यात आल्या आहेत. ही पशू-पक्ष्यांच्या जैवविविधतेच्यादृष्टीने धोक्याची घंटा आहे. पशू-पक्ष्यांच्या गुणवत्तेमध्ये वाढ करण्याच्यादृष्टीने या जाती महत्त्वाच्या आहेत. येत्या काळात मोठ्या प्रमाणात वाढणाऱ्या लोकसंख्येला दूध, मांस आणि अंड्यांचा पुरवठा अन्नसुरक्षेच्यादृष्टीने महत्त्वाचा आहे.
हवामान बदलामुळे पीक उत्पादनाच्या बरोबरीने जनावरांचे दूध उत्पादन, रोग प्रतिकारशक्तीमध्ये घट दिसून येत आहे. यासाठी देशी जनावरांतील रोगप्र तिकारशक्ती, दूध गुणवत्ता संशोधनाच्यादृष्टीने महत्त्वाची ठरणार आहे. पशुशास्त्रज्ञ देशी जनावरांच्या जनुकांचा यादृष्टीने अभ्यास करीत आहेत. या स ंशोधन प्रकल्पांना "एफएओ'ने आर्थिक मदतही केली आहे. या संस्थेच्या माध्यमातून विविध देशांत झालेल्या संशोधनाची देवाण-घेवाण करण्यात येणार आहे, त्यामुळे जगभरातील देशी जनावरांच्या संशोधनाला मदत होणार आहे.
"एफएओ'च्या अहवालाची दखल घेत विविध देशांनी देशी जनावरांच्या जातींच्या संगोपनासाठी आणि संशोधनासाठी स्वतंत्र प्रकल्प तयार केला आहे. प्रकल्पात सहभागी झालेल्या दहा देशांनी देशी जनावरांच्या जनुकांचा अभ्यास करण्यासाठी राष्ट्रीय प्रकल्पाची आखणी केली आहे, तर 28 देश सध्या प्रकल्पाची आखणी करीत आहेत. बेल्जियमने शेळी, जनावरे आणि डुकरां च्या जातींच्या संवर्धनाबाबत प्रकल्प हाती घेतला आहे. या देशातील पशुसं वर्धन विभागाने या जनावरांच्या देशी जातींच्या जनुकांचा अभ्यास करण्यासाठी स्वतंत्र जनुक बॅंक तयार केली आहे.
बोलिव्हिया देशाने शेळी - मेंढी, डुकरे, गाईंच्या संवर्धनासाठी प्रकल्प हाती घेतला आहे. केनिया सरकारने जनगणनेच्या सोबत संबंधित लोकांकडे असलेल्या जनावरांच्या जातींचे सर्व्हेक्षण हाती घेतले आहे. घानामध्ये देशी जनावरांच्या संगोपनासाठी शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण वर्ग सुरू केला आहे. चीनमधील पशुसंवर्धन विभागाने 138 देशी जनावरांच्या नोंदी केल्या आहेत, तसेच या जातींच्या संवर्धनासाठी 119 पशुसंगोपन प्रक्षेत्रांना सुरवात केली आहे.
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
लोकपंचायत संस्थेने संगमनेर तालुक्यात शाश्वत शेतीच्...
सदर योजना महाराष्ट्र राज्यात सन २००४-०५ पासून राबव...
खेकडा संवर्धनाविषयी तांत्रिक सल्ला कोठे मिळेल याबा...
खेकडा संवर्धन हे तलावामध्ये तसेच पिंजरा पद्धतीनेदे...