अश्वपालकांनी केलेल्या विनंत्या मान्य करून घोडेवर्गीय जनावरांसाठी (घोडे, गाढव, खेचर) असलेल्या राष्ट्रीय संशोधन केंद्राने शेतकरी दूरध्वनी सेवा केंद्र (किसान कॉल सेंटर) सुरू केले आहे. भारतीय कृषी संशोधन परिषदेतर्फे (आयसीएआर) घोडेवर्गीय जनावरांसाठी राष्ट्रीय संशोधन केंद्राची स्थापना हिस्सार (हरियाना) येथे करण्यात आली आहे.
आयसीएआरचे महासंचालक डॉ. एस. अय्यप्पन यांनी या सेवेचे अलीकडेच उद्घाटन केले. हिस्सार येथेच केंद्रीय म्हैस संशोधन संस्था कार्यरत आहे. म्हशींच्या संदर्भात शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन त्यासंदर्भातील सल्लाही त्यांना या केंद्रातून दिला जाणार आहे. उद्घाटन प्रसंगी डॉ. अय्यप्पन यांनी हरियानातील जिंद जिल्ह्यातील घोडेपालक जयवीर शर्मा यांची शंका दूरध्वनीवरून जाणून घेतली. घोडेपालकांना येणाऱ्या विविध अडचणींवर सल्ला देण्याचे काम या केंद्रातून यापुढे केले जाणार आहे.
आयसीएआरअंतर्गत हिस्सार येथे राष्ट्रीय घोडेवर्गीय जनावरे संशोधन केंद्राची स्थापना (एनआरसी फॉर इक्वाईन) करण्यात आली आहे. घोडे, गाढव, खेचर आदी जनावरांना होणाऱ्या रोगांवर उपाय विकसित करणे, रोगांचे निदान, त्यावर देखरेख, सल्ला आदी स्वरूपाचे कार्य येथे करण्यात येते. घोड्यांचे ऐतिहासिक महत्त्व आपण सर्वजण जाणून आहोतच. एनआरसीने उपलब्ध केलेल्या माहितीनुसार भारतात १.७७ दशलक्ष घोडावर्गीय जनावरे आहेत. यात १.७३ दशलक्ष गाढव, खेचर, बुटके घोडे आदींचा समावेश आहे. कोरडवाहू, अर्ध-कोरडवाहू, तसेच पहाडी भागातील ग्रामीण जनतेच्या जीवनाचा आधार हीच जनावरे आहेत. घोड्यांचे काठियावाडी, मारवाडी, मणिपुरी आदी विविध प्रकार असून, प्रत्येकाचे वेगळे वैशिष्ट्य आहे.
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
दक्षिण मुंबईतल्या ब्रिटीशकालीन, परंतू आता विस्थापि...
घोडा हाताळण्याची व स्वार होऊन चालविण्याची कला.
स्तनी वर्गातील विषमखुरी गणाच्या ईक्विडी कुलातील एक...
खेचर हा एक पाळीव व संकरित प्राणी असून घोडी आणि गाढ...