हे जिवाणू जमिनीमध्ये पिकांच्या मुळाभोवती राहून असहरजवी पद्धतीने काम करतात. हे हवेतील नत्र शोषून पिकांना उपलब्ध करून देतात. हे जिवाणू शेंगवर्गीय पिके वगळून इतर सर्व एकदल, तृणधान्य पिकांना उपयोगी पडतात. 250 ग्रॅम जिवाणू संवर्धकाची प्रतिदहा किलो बियाण्यास बीजप्रक्रिया करावी. पिके : ज्वारी, बाजरी, ऊस, मका, कापूस, सूर्यफूल, मिरची, वांगी, डाळिंब, पेरू, आंबा इ.
हे जिवाणूशेंगवर्गीय पिकांच्या मुळांवर गाठी निर्माण करून हवेतील नत्रवायू शोषून घेऊन मुळांवाटे पिकास उपलब्ध करून देतात. रायझोबियम जिवाणूसंवर्धक सर्व शेंगवर्गीय पिकांना उपयोगी पडत नाही. त्यामध्ये वेगवेगळे सात गट आहेत. वेगवेगळ्या गटांतील पिकांना विशिष्ट प्रकारच्या रोयझोबियम गटाचे जिवाणूसंवर्धक वापरावे. 250 ग्रॅम जिवाणू संवर्धकाची प्रतिदहा किलो बियाण्यास बीजप्रक्रिया करावी.
ऊस व इतर शर्करायुक्त पिकांमध्ये मुळांद्वारे हे जिवाणू प्रवेश करून नत्राचे स्थिरीकरण करतात. हे जिवाणू आंतरप्रवाही असल्याने स्थिरीकरण केलेल्या नत्राचा पीकवाढीमध्ये सर्वाधिक वापर होऊ शकतो. ऊस पिकास 40 ते 50 टक्के नत्राचा पुरवठा करतात.
हे जिवाणू जमिनीतील अविद्राव्य स्थिररूपी स्फुरदाचे द्राव्य रासायनिक स्वरूपात रूपांतर करून ते पिकांना उपलब्ध करून देतात. 250 ग्रॅम जिवाणू संवर्धकाची प्रतिदहा किलो बियाण्यास बीजप्रक्रिया करावी.
संपर्क - 02426-243209
मृद्शास्त्र व कृषी रसायनशास्त्र विभाग,
महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी
स्त्रोत : अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
ऊस बियाणे लागण करताना बियानाद्वारे नवीन रोपामध्ये ...
कृषेि उत्पादनवाढीसाठी, पिकाच्या संकरित व सुधारित ब...
मेंदुज्वर हे माणसाच्या मणक्यातील जलाचे व मेंदुला अ...
रायझोबियमच्या उपजातीचे वर्गीकरण हे त्या जीवाणूची व...