अंडी, लिंबूरस आणि गुळ यांचा वापर करुन तयार करायचे वाढवर्धक/एन्झाईम/मुट्टाई रस्सम:
१) 25 लिंबुच्या रसामध्ये 250 ग्राम गुळ मिक्स करुन द्रावण तयार करा.
२) काचेच्या किंवा प्लास्टिकच्या झाकण आसलेल्या बरणीमध्ये १० ते 15 कोंबडीचि किंवा बदकाची अंडी ठेवा(नफोडता) आधि तयार केलेले लिंबुरस व गुळ यांचे द्रावण या अंडे ठेवलेल्या बरणीत ईतके टाका कि सर्व अंडी या द्रावणात बुडतील.
३) यानुसार गरज वाटलीच तर लिंबुची संख्या 5/7 ने वाढवून घ्या. त्यात अगदी गरज वाटेल इतके कमीत कमी पाणी टाकायला हरकत नाही.
४) बरणी 10 दिवस झाकण घट्ट लावून हवाबंद ठेवा.
५) 11 व्या दिवशी अंड्याचे कवच रबरासारखे नरम झालेले आढळेल. स्वच्छ हाताने अंडी बरणीतील द्रावणात कुस्करुन टाका.
६) 11 व्या दिवशी हे द्रावण जितके असेल तितकेच गुळाचे पाणी (250 ग्राम गुळाचे पाण्यात द्रावण तयार करा) पुन्हा या बरणीत टाका. बरणी आणखी 10 दिवस हवाबंद करा.
७) 21 व्या दिवशी तयार मुट्टाई रस्सम फवारणीसाठी तयार. प्रती एक लिटर पाण्यात 10 ते 15 मिली वाढवर्धक/एन्झाईम/मुट्टाई रस्सम पिकावर फवारणीसाठी वाढवर्धक म्हणून फवारता येईल.
८) पंचगव्य, व्हर्मीवाश, जिवामृत, दशपर्णी. आदीसोबतही फवारणी केली तरी चालेल.
९) लिंबुच्या बागेत पडलेले किंवा लिंबु विक्रेत्याकडे असलेले डागी लिंबु स्वस्त किंमतीत घेवून हे द्रावण करण्यास हरकत नाही.
१०) हे द्रावण सहा महिन्यापर्यत वापरता येइल. अधून मधुन बरणीचे झाकण 1-2 मिनिट उघडून द्रावण काडीने हलवून पून्हा हवाबंद करावे.
हे वाढ वर्धक व संजीवक म्हणून काम कराते.
अंतिम सुधारित : 6/17/2020
उगम ग्रामीण विकास संस्थेमार्फत हिंगोली शहरात जिल्ह...
सेंद्रिय व हिरवळीच्या खतांच्या कमी वापरामुळे जमिनी...
पुणे येथील राजलक्ष्मी भोसले यांनी आपल्या 35 गुंठे ...
जमिनीच्या पृष्टभागावर पिकांच्या बुंध्याभोवती सेंद्...