नेदरलॅंडस हे जागतिक पातळीवर हरितगृह उभारणी व उत्पादनासाठी प्रसिद्ध असून, पिकांच्या वाढीच्या दरम्यान जेवढ्या काटेकोरपणे नियोजन केले जाते, तेवढेच नियोजन हरितगृहामध्ये वापरल्या जाणाऱ्या ऊर्जेवरील खर्चात कपात करण्यासाठी करण्याची आवश्यकता वॅगेनिंगन विद्यापीठातील फळबाग आणि उत्पादन शरीरशास्त्र विभागातील प्राध्यापक लियो मार्सेलिस यांनी व्यक्त केली. ते पिकांच्या शरीरशास्त्रातून अधिक उन्नतीकडे या विषयावर बोलत होते.
सध्या हरितगृहामध्ये पाणी व कीडनाशकांचा कार्यक्षम वापर करून अधिक दर्जेदार उत्पादन मिळविण्यात येते, तरीही फळे, भाज्या व फुलांच्या उत्पादनासाठी नावीन्यपूर्ण व शाश्वत उत्पादन पद्धतीची मागणी मोठी आहे. त्यातही हरितगृहामध्ये अधिक उत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या प्रकाश योजनेमध्ये एलईडी दिव्यांचा अंतर्भाव करण्याची आवश्यकता असून, त्यामुळे खर्चामध्ये 50 टक्क्यांपर्यंत बचत करणे शक्य असल्याचे प्राध्यापक लियो मार्सेलिस यांनी सांगितले.
फळबाग क्षेत्र हे नेदरलॅंडससाठी आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचे असून, फळे, भाज्या व फुले यांच्या निर्यातीतून एकूण 16 अब्ज युरोची प्राप्ती होते. मात्र पिकांच्या लागवड आणि व्यवस्थापन पद्धतीइतकेच काढणीपश्चात तंत्रज्ञानाकडे लक्ष देण्याची गरज आहे. या टप्प्यातच एकूण उत्पादनाच्या एक तृतीयांश उत्पादन खराब होते. हे प्रमाण निम्म्याने कमी करणे शक्य आहे.
नेदरलॅंडसमध्ये उत्पादनामध्ये पाणी, अन्नद्रव्ये आणि किडीच्या नियंत्रणाच्या कार्यक्षम पद्धती वापरल्या जातात. (उदा. हरितगृहामध्ये प्रति किलो टोमॅटो उत्पादनासाठी 15 लिटर पाण्याचा वापर होतो, तर हरितगृहाबाहेरील शेतीमध्ये प्रति किलो टोमॅटो 60 लिटर पाणी वापरले जाते.) मात्र हरितगृह क्षेत्रामध्ये ऊर्जेचा वापर प्रचंड असून, देशातील एकूण गॅस वापरापैकी 10 टक्के केवळ हरितगृहासाठी वापरला जातो. तसेच उत्पादन खर्चापैकी 15 ते 30 टक्के खर्च हा ऊर्जेसाठी होतो.
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
तारगाव (ता. कोरेगाव, जि. सातारा) येथील दिलीप बाबास...
हरितगृह हे सांगाड्यांच्या रचनेला पारदर्शक साहित्या...
खूप महागाचे सामान वापरून ग्रीनहाउस तयार करणे भारती...
हवामानात विविधता असल्याने वेगवेगळया फुलांची लागवड ...