आवश्यक सामान
लाकडी खांब
लाकडी खांबांची निवड या ग्रीनहाउसच्या मजबूतीसाठी फार महत्वाची आहे. नीलगिरीचे खांब कसोरिनापेक्षा जास्त फायद्याचे ठरतात कारण यामध्ये उधई लागत नाही आणि बुरशी पण सहसा लागत नाही. आणखी, खिळे लावल्यास, यांचे लाकूड फाटत नाही कारण याची फायबर मजबूत आहे.
दोन प्रकारचे पोल वापरतात. एक 7 ते 10 सेंमी.व्यासाचे व दुसरे 5 सेंमी.चे असतात.
मोठ्या आकाराच्या वस्तू मुख्य बांधणीसाठी व लहान आकाराच्या वस्तू आधाराला टेकू देण्यास वापरतात.
आवश्यक असलेल्या पोल्सची संख्या:-
मोठ्या व्यासाचे पोल : 21
लहान व्यासाचे पोल : 34
एकूण पोल : 55
जीआय वायर
4 मिमि व्यासाची जीआय वायर
मुख्य बांधणीच्या बांबूंना बांधण्यासाठी वापरतात. एकूण 2 किलोग्राम वायर हवी.
खिळे
लांब खिळे लाकडी खांबांना ठोकण्यासाठी वापरतात. 7 सेमी; लांबीचे खिळे 3किलो हवेत.
यूव्ही स्टेबिलाइज्ड एलडीई फिल्म
संरचना कोणत्या ही लवचिक ग्रीनहाउस आवरणांसाठी योग्य आहे. LDPE (लो डेंसिटी पॉलिथिन) फिल्म सामान्यपणे ग्रीनहाउस करीता विश्वभरात वापरतात. त्यांना इंस्टाल करणे सोपे असते आणि त्या स्वस्त असतात. भारतात, LDPE फिल्मचे उत्पादक इंडियन पेट्रोकेमिकल लि. (IPCL) आहेत आणि त्यांच्या कडे ग्रीनहाउस साठी लागणारे सर्व साहित्य मिळते. आमच्या प्रायोगिक वापरात असे आढळले कि या कंपनीच्या फिल्म वापरल्याने रोपांच्या वाढीकरीता आवश्यक असलेल्या पुष्कळ बाबतीत फायदा आहे जसे, अल्प प्रकाश, CO2, आणि संबंधित आर्द्रता यांची परिमाणे आणि प्रमाण व्यवस्थितपणे सांभाळले जावू शकते.
एकूण आवश्यक फिल्म
फिल्म (यूव्ही फिल्म लो डेंसिटी पॉलिथिन फिल्म) फ्लोर क्षेत्राच्या 2.48 पट मोठी असावी लागते. उदा. 35' x 20' = 700 स्क्वे.फुटाच्या ग्रीनहाउससाठी 1736 स्क्वे.फुट यूव्ही फिल्मची गरज पडते. या फिल्मचे वजन अंदाजे 30 किग्रा. भरते ज्याची जाडी 200 मायक्रॉन असते.
कोलतार/बिट्यूमेन: 2 लिटर
- 1. एलडीपीई फिल्म रोल (10 सेमी. रूंदीचा)
एलडीपीई फिल्मचा रोल/उरलेली यूव्ही स्टेबिलाज्ड एलडीपीई फिल्मचा रोल ज्याची रूंदी 10 सेंमी. असेल पोल बांध्ण्यासाठी वापरतात. जोड, आणि वायरचा सरळ संबंध
यूव्ही स्टेबिलाज्ड फिल्मशी येवू न देणे.
आवश्यक असलेली एकूण फिल्म किलोग्रामध्ये: 3 किलोग्राम
प्लॅस्टिकची दोरी
प्लॅस्टिकची दोरी LDPEशीटला ग्रीनहाउस स्ट्रक्चर आणि दोरी यांच्या मध्ये सैंडविच करण्यासाठी वापरतात. वाÚयामुळे शीट उडून जावू नये म्हणून असे करतात. प्लॅस्टिकची दोरी : 5 किलोग्राम
बांबूच्या काठ्या
बांबूचा वापर परिघाभोवती वरपासून खालपर्यंत जोड सांधण्यासाठी आणि एलडीपीई शीटला आधार देण्यासाठी करतात. एकूण 30 शीटची गरज असते.
जोड खिळे
1. जोड खिळ्यांचा वापर शीटला रबराच्या वॉशरबरोबर जोडण्यासाठी करतात.
2. मुख्य बांधकामाशी शीटला पक्क्या त Úहेने ठोकण्यासाठी जोड खिळ्यांचा वापर करतात.
आवश्यक एकूण जोडखिळे ¼ 1’इंच लांबीचे½ : 250 ग्राम
|