सर्वच द्राक्ष विभागांमध्ये वातावरण पुढील आठवड्यात निरभ्र राहण्याची शक्यता आहे. सांगली, सोलापूर या भागांमध्ये रविवार, सोमवारपर्यंत वातावरण अधूनमधून अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. वातावरण ढगाळ झाले तरीसुद्धा पावसाची शक्यता नाही. सर्व विभागांमध्ये कमाल तापमान 32 ते 35 अंश सेल्सिअसपर्यंत जाईल. सकाळचे तापमान 15 अंशांच्या पुढे राहील. त्यामुळे सर्वसाधारणपणे कोणत्याही रोगाचा धोका नाही.
नाशिक विभागातील बहुतांशी बागामध्ये घड पेपरमध्ये झाकले गेले आहेत. म्हणूनच बागेमध्ये पानावरती किंवा काड्यावरती भुरी दिसली, तरीसुद्धा घडापर्यंत पोचणार नाही किंवा घडावरती पेपर लावण्याआधी घडावर भुरी असल्यास वरील फवारणी केल्यानंतर घडावरील भुरी नियंत्रित होणार नाही. म्हणून पेपर लावण्याआधी घडावरची भुरी किंवा बागेतील पानांवरील किंवा काडीवर भुरींचे नियंत्रण चांगल्या प्रकारे करून घेणे आवश्यक आहे. शेवटचे काही दिवस (मण्यात पाणी भरल्यापासून काढणीपर्यंत) सर्वसाधारणपणे सर्व प्रकारच्या बागांतील फवारण्या कमी करायच्या असतात. शेवटच्या काही दिवसांमध्ये बागेमध्ये ढगाळ वातावरण राहिल्यास भुरीचा प्रादुर्भाव होऊ शकतो. अशा वेळी बुरशीनाशकांचा वापर अतिशय सावधपणे केला पाहिजे. फुलोऱ्याच्या नंतरच्या अवस्थेमध्ये भुरीचे नियंत्रण चांगले झालेले नसल्यास देठावरील भुरी येऊ शकते. काही वेळा बाग मण्यात पाणी भरल्यानंतरच्या अवस्थेमध्ये असताना ढगाळ किंवा हलक्या वळवाच्या पावसाची शक्यता असते. अशा पावसानंतर वाढलेल्या आर्द्रतेमध्ये देठावर भुरी येण्याची शक्यता असते. देठावरील भुरी नियंत्रित करण्यासाठी शक्यतो ट्रायझोल बुरशीनाशकांचा वापर करणे टाळावे. कारण अशा बुरशीनाशकांचा वापर झाल्यानंतर बागेमध्ये रेसिड्यूचा धोका असतो.
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
ऊस हे आपले प्रमुख नगदी पीक असून करार शेती असल्याने...
उत्पादनसंस्थेला वस्तूचे उत्पादन करण्यासाठी निरनिरा...
अभ्यास, ज्ञान मिळवण्याची वृत्ती, जिद्द, चिकाटी आणि...
भाज्या, कडधान्ये, तृणधान्ये, बिया वेगवेगळया जीवनोप...