मागील काही दिवसांपासून ढगाळ वातावरण आहे. हे वातावरण तुरीवरील शेंगा पोखरणाऱ्या अळीस (हेलिकोवर्पा आर्मिजेरा) पोषक आहे. प्रादुर्भाव दिसून येत आहे. या वातावरणात या किडीचे पतंग मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. या किडींचा प्रादुर्भाव कळ्या व फुले लागल्यापासून शेंगांपर्यंतच्या काळात आढळून येतो. त्यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते.
शेंगा पोखरणऱ्या अळ्या सुरवातीला पिकाच्या कोवळ्या पानांवर, फुलांवर किंवा शेंगांवर उपजीविका करतात. नंतर शेंगा भरताना त्या दाणे खातात. दाणे खात असताना त्या शरीराचा पुढील भाग शेंगांमध्ये खुपसून व बाकीचा भाग बाहेर ठेवलेल्या अवस्थेत शेतात आढळतात. त्यामुळे आतील कोवळ्या दाण्याचे जवळपास 60-80 टक्के नुकसान होते.
सध्याचे ढगाळ वातावरण हरभऱ्यावरील घाटेअळीस पोषक ठरत आहे. घाटेअळीचा प्रादुर्भाव हरभरा पिकाच्या कोवळ्या पानांवर आढळून येत आहे. डिसेंबर-जानेवारीत या किडींचा प्रादुर्भाव जास्त आढळून येतो. सुरवातीस लहान अळ्या कोवळी पाने, कळ्या व फुले कुरतडून खातात. शेवटी घाटे लागताच अळ्या घाटे कुरतडून त्यास छिद्र पाडतात व आपले डोके आत खुपसून दाणे खातात. दर दिवशी एक अळी 5 ते 16 घाट्यांचे नुकसान करते. या अळीमुळे पिकाचे 5 ते 38 टक्क्यांपर्यंत नुकसान होते.
क्लोरपायरिफॉस (20 टक्के प्रवाही) 20 मि.लि. किंवा
क्विनॉलफॉस (20 टक्के प्रवाही) 20 मि.लि. किंवा
अधिक प्रादुर्भाव असताना इमामेक्टीन बेन्झोएट (5 टक्के) 4 ग्रॅम.
संपर्क -
डॉ. बी. बी. भोसले, (संचालक विस्तार शिक्षण), 9423437894.
डॉ. पी. आर. झंवर (विभाग प्रमुख कीटकशास्त्र विभाग), 3420848483.
(वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, परभणी)
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
ढगाळ हवामानामुळे मावा किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची...
तापमानवाढ आणि आर्द्रतेत घट झाल्यास उसावरील खोडकिडी...
डाळिंब पिकामध्ये बॅक्टेरिअल ब्लाइट, मर (फ्युजॅरिय...
उन्हाळी भुईमुगामध्ये पाने खाणाऱ्या व गुंडाळणाऱ्या ...