सध्या तूर पिकातील हळवे वाण शेंगा भरण्याच्या अवस्थेत आहेत. गरवे वाण काही ठिकाणी शाखावृद्धी अवस्थेत, तर काही ठिकाणी फुलकळी अवस्थेत आहेत. हीच वेळ पीक संरक्षणाच्या दृष्टीने संवेदनक्षम असते. या कालावधीत पीक संरक्षणासाठी खालील एकात्मिक कीड नियंत्रण पद्धती फायदेशीर ठरतील.
कामगंध सापळे -
प्रतिहेक्टरी 5 याप्रमाणे वापरून घाटे अळीचे नियंत्रण करावे.
यासाठी आर्थिक धोक्याची पातळी अशी -
1) पहिली फवारणी - पीक फुलोऱ्यात असताना 5 टक्के निंबोळी अर्क (25 कि.ग्रॅ. प्रतिहेक्टर) अधिक 1 टक्का साबणाच्या पाण्याबरोबर फवारावे. एका हेक्टरसाठी 25 किलो निंबोळ्यापासून तयार केलेला अर्क वापरावा.
2) दुसरी फवारणी - पीक फुलोऱ्यात असताना हेलीओकील (500 एलई) 5 मि.लि. प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे.
3) तिसरी फवारणी (रासायनिक कीटकनाशके) - पिकास जास्तीत जास्त शेंगा लागल्यानंतर करावी. वरील उपायांनी किडींचे नियंत्रण न झाल्यास ही तिसरी फवारणी खालीलपैकी कोणत्याही एका कीटकनाशकाची करावी. खाली दिलेले कीटकनाशकाचे प्रमाण हे प्रति 10 लिटर पाण्यासाठी आहे. आपल्या क्षेत्राप्रमाणे जेवढे लागेल तेवढे कीटकनाशक वापरावे.
तक्ता - compose/20-11-2014/agr.cs.(1)
कॉपी आहे.
उपाययोजना व फवारणी वेळ +कीटकनाशक + +पाणी आणि प्रमाण
+ +1 लि. +10 लि. +500 लि.
पहिली फवारणी +ऍझाडीरेक्टीन 0.03 टक्के +5 मि.लि. +50 मि.लि. +2500 मि.लि.
पीक फुलकळी अवस्थेत असताना +(300 पीपीएम) + +
+हेलीओकील 2 टक्के 250 एलई +0.5 मि.लि. +5 मि.लि. +250 मि.लि.
+पाण्यातील द्रावण +
दुसरी फवारणी +क्विनॉलफॉस 25 टक्के प्रवाही +2.80 +28 मि.लि. +1400 मि.लि.
किंवा
किडीने नुकसान पातळी ओलांडल्यावर+
+डायमेथोएट 30 टक्के प्रवाही +2.47 मि.लि. +24 मि.लि. +1235 मि.लि.
तिसरी फवारणी +इन्डोक्झाकार्ब 14.55 टक्के +0.7 मि.लि. +7 मि.लि. +350 मि.लि.
दुसऱ्या फवारणीनंतर 15 दिवसांनी +
+ स्पिनोसॅड 45 टक्के प्रवाही किंवा +0.26 मि.लि. +133 मि.लि.
+फ्ल्युबेंडामाईड 20 टक्के दाणेदार किंवा +0.5 ग्रॅम +5 ग्रॅम +250 ग्रॅम
ईमामेक्टीन बेंझोएट 5 टक्के दाणेदार किंवा +0.44 ग्रॅम +4.4 ग्रॅम +220 ग्रॅम
लॅम्डासायलोथ्रीन 5 टक्के प्रवाही किंवा +1.0 मि.लि. +10 मि.लि. +500 मि.लि.
फ्ल्युबेंडामाईड 48 टक्के प्रवाही किंवा +0.2 मि.लि. +2 मि.लि. +100 मि.लि.
रॅनाक्झीपीर 20 टक्के प्रवाही +0.3 मि.लि. +3 मि.लि. +150 मि.लि.
संपर्क - प्रा. अशोक चव्हाण, 9420639498
(कडधान्य सुधार प्रकल्प, महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी)
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
ढगाळ हवामानामुळे मावा किडीचा प्रादुर्भाव वाढण्याची...
डाळिंब पिकामध्ये बॅक्टेरिअल ब्लाइट, मर (फ्युजॅरिय...
निसर्गाला समजून घेऊन वेळोवेळी शेत निरीक्षण करीत रा...
उन्हाळी भुईमुगामध्ये पाने खाणाऱ्या व गुंडाळणाऱ्या ...