राज्यातील बहुतांश भागांत ढगाळ वातावरण तयार झाले आहे. सकाळी पडणारे धुके आणि दंव, तसेच जास्त आर्द्रता आणि कमी तापमानासोबतच ढगाळ वातारण, कांदा पिकात बुरशीजन्य आणि जिवाणूजन्य रोगांच्या वाढीसाठी पोषक ठरते.
- ढगाळ वातावरणात पानांवर येणारा जांभळा करपा (पर्पल ब्लॉच) , तपकिरी करपा (स्टेमफिलीयम ब्लाईट) आणि करपा (कोलिटोट्रायकम ब्लाईट) या रोगांचा कांदापिकावर प्रादुर्भाव होऊन मोठे नुकसान होऊ शकते.
- या रोगांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून पायरॅक्लोस्ट्रॉबीन + मेटिराम हे संयुक्त बुरशीनाशक 2 ग्रॅम प्रति लिटर किंवा ट्रायफ्लोक्झीस्ट्रोबीन + टेब्युकोनॅझोल हे संयुक्त बुरशीनाशक 2 ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. या द्रावणात सर्फेक्टंट मिसळावा.
- ढगाळ वातावरण निवळल्यानंतर खुरपणी करून तणनियंत्रण करावे. आंतरमशागत केल्याने जमीन भुसभुशीत होऊन हवा खेळती राहील.
- काढणीसाठी तयार असलेल्या कांदा पिकामध्ये अशा वातावरणात जिवाणूजन्य सड (बॅक्टेरीयल सॉफ्ट रॉट) या रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. या रोगाच्या नियंत्रणासाठी स्ट्रेप्टोमायसीन 200 पीपीएम. (1 ग्रॅम प्रति 5 लिटर पाणी) अधिक कार्बेन्डाझिम 1 ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. या द्रावणात सर्फेक्टंट मिसळावा.
- फुलकिडीच्या नियंत्रणासाठी डेल्टामेथ्रीन 1 मि.लि. किंवा फिप्रोनिल 1.5 मि.लि. किंवा कार्बोसल्फान 2 मि.लि. प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. या द्रावणात सर्फेक्टंट मिसळावा.
- रब्बी हंगामासाठी रोपवाटिकेत कांदा बियाण्याची पेरणी झाली आहे. सध्या 25ते 30 दिवसांपर्यंतच्या रोपवाटिकेमध्ये ढगाळ वातावरणात मर रोगाचा प्रादुर्भाव होऊ शकतो. रोगाच्या नियंत्रणासाठी कॉपर ऑक्झिक्लोराईड 3 ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. त्यानंतर लगेचच 3 दिवसांनी कार्बेन्डाझिम 1 ग्रॅम प्रतिलिटर पाण्यात मिसळून रोपवाटिकेत भिजवणी (ड्रेचिंग) करावी.
संपर्क - (02550)-237816,237551,202422
तुषार आंबरे - 9850116584
डॉ. आर. सी. गुप्ता - 9422497764
राष्ट्रीय बागवानी संशोधन आणि विकास प्रतिष्ठान
चितेगाव फाटा, जि. नाशिक
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या
तार्यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.
© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.