जवळपास ९५ टक्के जमीन ही कोरडवाहू असून काही भागात २० ते ३० टक्के तर काही भागात ५० ते ६० टक्के जमीन उथळ व धूप झालेली आहे. दरवर्षी हे प्रमाण वाढते आहे. यासाठी पाणलोटावर आधारित पावसाचे व जमिनीचे व्यवस्थापन करणे काळाची गरज आहे. यासंदर्भात कृषी विद्यापीठाने फार आधी दखल घेतली असून जवळपास ३२ हेक्टर क्षेत्रावर आदर्श पाणलोट क्षेत्र विकसित केले आहे. भूपृष्ठावरील व भूगर्भातील पाण्याचा साठा जलदगतीने वाढविण्यासाठी प्रत्येक शेतक-याने आपले शेत हेच सूक्ष्म पाणलोट क्षेत्र समजून शेतातून वाहून जाणारे पावसाचे पाणी मूलस्थानी जिरवावे. तसेच शेतातील खालच्या भागामध्ये योग्य आकाराचे शेततळे खोदून शेतातील जास्तीचे पाणी जिरवणे किंवा साठवणे आवश्यक आहे.सन १९८५ पासून कृषी विद्यापीठात पाणलोटसंबंधी सुरु असलेल्या अभ्यासावरुन पाणी व्यवस्थापनाचा आदर्श आराखडा तयार केला आहे. त्यालाच पी.के.व्ही. म्हणतात .
उद्देश
- शैतातील पावसाचे पाणी अडवणे, जिरवणे. यापैकी जिरवलेल्या पाण्यापैकी किमान २५ टक्के पाणी भूगर्भात शिल्लक ठेवावे.
- एक हेक्टर शैतात पाऊसमानाप्रमाणे ६० ते ७५ लाख लिटर पाणी जिरवणे शक्य होते. संकल्पनेनुसार जितक्या क्षेत्रावर हे तंत्र अवलंबिले जाईल त्याच्या २५ ते ३० टक्के क्षेत्रावर ठिबक सिंचनाचा वापर करुन कमीतकमी पाणी लागणा-या फळबागा उभा राहू शकतात.
- त्याचप्रमाणे काळ्या खोल जमिनीत शैततळ्यात अपधाच साठवून खंडित पावसाच्या दरम्यान ठिबक तथा फवारा सिंचन पद्धतीने ३० ते ५० मि.मी. खोलीचे अोलीत करावे.
संकल्पनेतील अंतर्भूत बाबी पुढीलप्रमाणे
अ) मुलस्थानी मृदा व जलसंधारणाचे उपाय :
जमिनीचा पोत विशेषतः
उतार आणि शैतातील ओघळी इ. सर्व बाबी विचारात घेऊन शेतक-यांनी पुढीलप्रमाणे उपाय करावेत.
- मिश्र पीक पद्धती.
- समतल बांधाला समांतर व उताराला आड़नी पेरणी कराची.
- उभ्या पिकांमध्ये शेवटच्या कोळपणीच्या वेळेस जानकुळाला दोरी बांधून सन्या काढाव्यात.
- शेतातील फळझाडांमध्ये पावसाळ्यापूर्वी नांगराने आडवे उभे चर काढून चौकोनी वाफे तयार करावेत शैतातील ओघळीवर गवत, दगडाचे, मातीचे व त्याचप्रमाणे फांदेरी बांध घालून जागच्या-जागी पाणी अडवून मुरू द्यावे. जास्त उतार असलेल्या हलक्या जमिनीत सलग कंटुर चराचर फळबागा तसेच क्नकुरण विकसित करावें.
ब) शेततळे
- मुलस्थानी जलसंवर्धन झाल्यावर जास्तीचे पाणी शेततळ्यामध्ये साठवून जिरवावे. एकूण क्षेत्रफळाच्या १ ते १.५ टक्के क्षेत्रावर योग्य आकाराचे शैततळे खोदाचे. शैततळे शक्यतोवर अस्तित्वात असलेल्या विहिरीच्या/कूपनलिकेच्या जवळपास वरच्या बाजूस घ्यावे. शैततळ्यासाठी जागा निवडताना जमिनीची पाझरक्षमता चांगली असणे आवश्यक आहे.
- विहीर, कूपनलिका घेणे शक्य नसलेल्या ठिकाणी पावसाचा अपधाव शैततळ्थात जमा करणे व दोन पाक्सातील अंतर वाढले असता पाणी वापरावे.
- शैततळ्यासाठी जागा निवडताना ती पाझरणारी नसावी. एक संरक्षित ओलीत खरिपात आणि रब्बीमध्ये देण्यासाठी ३ ते ४ टक्के क्षेत्र हे शेततळ्याखाली असणे गरजेचे आहे. विदर्भाच्या कोरडवाहू शेतीमध्ये शेततळ्यांची भूमिका फार मोठी आहे. ३० मी. रुंद, ३० मी. लांब आणि ३ मी. खोल आणि १:५:1 उतार असलेल्या शैततळयाची साठवणक्षमता जवळपास १९७२ घन.मी. असते. या शेततळ्यातून काळ्या खोल जमिनीत ३0 मि.मी. खोलीचे सह्य हेक्टर क्षेत्राला एक फायदे झालेले आहेत.
फायदे
- शैततळ्यातील पाणी ठिबक सिंचनाद्वारे वापरुन कपाशीला २ वेळा २५ मि.मी. खोलीचे संरक्षित ओलीत दिल्यामुळे कपाशीच्या उत्पादनात ६९ टक्के वाढ झाली. पाणी वापर कार्यक्षमतेत ४५ टक्के चिाढ़ झाली.
- सोयाबीन पिकाला तुषार सिंचन पद्धतीने एक संरक्षित पाणी दिल्यामुळे उत्पादनात ५० टक्के वाढ झाली. पाणी वापर कार्यक्षमतेत ५६.५२ टक्क्यांपर्यंत वाढ झाली.
- मुगाला एक संरक्षित ओलीत केल्यामुळे उत्पादनात ५० टक्के चाढ़ झाली.
- तुरीला ठिबक सिंचन टेप वापरुन शेततळ्यातील एक पाणी दिले असता तुरीच्या उत्पादनात ५० टक्के वाढ झाली. त्याचप्रमाणे पाणी वापर कार्यक्षमता ३७.५ टक्क्यांपर्यंत वाढली.
क) बोअरवेल : शेततळ्याच्या खालच्या बाजूस जेथे भूजलपातळी उथळ असेल तेथे २० ते ३० मी. खोल आणि जेथे भूजलपातळी खोल असेल तेथे ६० मी. खोलीचे व १० ते १५ सें.मी. व्यासाचे बोअरवेल घ्यावे.
ड) कमी अश्वशक्तीचा पंप व ठिबक संच : बोअर तथा विहिरीच्या खोलीनुसार एक अश्वशक्तीचा जेट तथा सबमर्सिबल पंपाद्वारे किमान एका मिनिटाला २० ते ५० लेि. पाण्याचा मर्यादित उपसा करुन सिंचनाच्या माध्यमातून एकूण क्षेत्राच्या किमान २५ ते ३० टक्के क्षेत्र ओलिताखाली आणावे. परंतु ज्या ठिकाणी शेततळ्यावरुन संरक्षित अोलीत करावयाचे आहे, तिथे ३ ते ५ अश्वशक्तीचा पंप वापरावा.
निष्कर्ष
डॉ.पी.डी.के.व्ही. मॉडेलचा अवलंब केल्यास खालील फायदे अपेक्षित आहेत.
- सपाट जमिनीमध्ये मिश्रपीक पद्धतीमुळे पावसाच्या अपधावेत १० ते १७ टक्के घट व त्याचप्रमाणे जमिनीच्या धुपेत घट होते.
- जैविक बांधाला (खस) समांतर पेरणी व मशागत केल्यास उताराला उभ्या पेरणीच्या तुलनेत अपधावेत ५० टक्के, जमिनीच्या धुपेत ७० टक्के घट होते. त्याचप्रमाणे जमिनीतील अक्षद्रव्यांच्या -हासात ६५ टक्क्यांनी घट होते. परिणामी २० ते २५ टक्क्यांनी उत्पन्नात वाढ होते. सरासरीपेक्षा कमी पावसाच्या वर्षात उत्पन्नातील वाढ ४० टक्क्यांपर्यंत अधिक दिसून आली आहे.
- सलग कंटूर चरांमुळे पाणलोटाच्या सर्व भागात सारख्या प्रमाणात ९८ टक्के मुलस्थानी मृदा व जलसंधारण होते. पिकास दिलेले खत वाहून जात नाही. जमिनीतील ओलावा अधिक काळ टिकून राहतो.
- सलग कंटूर चरावर कृषी फळबाग घेतल्याने हंगामी पिकांचे २५ टक्के फळांचे अधिक उत्पादन होते. भूपृष्ठावरुन वाहणाल्या पाण्याचे व मातीचे ९५ ते ९८ टक्के जागच्याजागी संधारण होते.
- अति उथळ जमिनीवर सलग कंटूर चर पद्धतीमध्ये वनकुरण विकसित चान्याचे हेक्टरी १५ ते २० टन अधिक उत्पादन मिळते. जमिनीची धूप कमी होते.
- शेळ्या-मेंढ्याची विकसित वनकुरणात चराई केल्यास मेंढ्यामध्ये ३० ते ४४ ग्रॅम प्रतिदिन वजनात वाढ झाल्याचे दिसून आले आहे. तसेच अंजन गवतामुळे गाई, म्हशींच्या दुधाची प्रत सुधारते.
- अंजन, रिठा, हिरडा, कवठ, जांभूळ, साग या झाडांची पावसाळ्यात लागवड केल्यानंतर किमान दोन वर्षापर्यंत आठवड्यातून फक्त एकवेळा ५ लिटर पाणी माठातून दिल्यास ही झाडे कमी पाण्यात चांगल्या प्रकारे येऊ शकतात.
- लहान शेतक-यांनी घराच्या आवारात किंवा शेतात गुरुत्वदाबावरचलित ठिबक सिंचनाचा वापर केल्यास भाजीपाल्यासारखी मर्यादित क्षेत्रात अतिशय कमी पाण्यात पिके घेता येतात.
अवलंबन
अमरावती, अकोला व बुलडाणा जिल्ह्यातील सुमारे ३५ हजार शेतक-यांच्या सहभागातून जवळपास १०,५०० शेततळ्यांच्या माध्यमातून ५५,ooo हेक्टर क्षेत्रावर संरक्षित ऑर्लिताचे अवलंबन करुन खरीप व रब्बी पिके काही अंशी शाश्वत झाली आहेत.
संपर्क क्र. : ९८२२७२३०२७
स्त्रोत - कृषी विभाग महाराष्ट्र शासन