थायलंडमध्ये पर्यटन उद्योग हा महत्त्वाचा आर्थिक उत्पन्नाचा मार्ग आहे, त्यामुळे वर्षभर या देशात विदेशी पर्यटकांचा ओघ असतो. पर्यटकांमुळे या देशातील फळे, भाजीपाल्यालाही चांगली मागणी असते. परदेशी ग्राहकांची सेंद्रिय फळे आणि भाजीपाल्याची मागणी लक्षात घेऊन गुणवत्ता सुधारण्यासाठी थायलंडच्या कृषी विभागाने ऑस्ट्रेलियातील कृषी विद्यापीठांचे सहकार्य घेतले आहे.
ऑस्ट्रेलियातील शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीमध्ये चांगली प्रगती केली आहे. ऑस्ट्रेलियातील तज्ज्ञ या शेतकऱ्यांना सुधारित लागवड तंत्रज्ञान, खते, कीड-रोग व्यवस्थापन, सेंद्रिय पद्धतीने पीक उत्पादन याबाबत विशेष मार्गदर्शन करणार आहेत. यासंदर्भात दोन्ही देशांमध्ये करार करण्यात आला.
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी व दुर्गम भागातील शेतक...
जिद्द, चिकाटी, मेहनत व सर्वांना सोबत घेऊन जाण्याची...
अन्नधान्य, भाजीपाला, फळे, कंदपिके उत्पादन, दुग्ध व...
राज्यात शेती व्यवसाय करताना होणारे अपघात, वीज पडणे...