वनराई बंधारा हा एक कच्च्या बंधाऱ्याचा प्रकार आहे. हे बंधारे नदी-ओहोळांवर बांधले जातात. ज्या ठिकाणी पाण्याचा साठा अधिक होऊ शकेल आणि वाहणाऱ्या पाण्याचे कमी रुंदीचे पात्र लक्षात घेऊन हा बंधारा घातला जातो. यासाठी सिमेंटच्या रिकाम्या पिशव्यांमध्ये वाळू भरून, पिशव्या शिवून बंधाऱ्यासाठी वापरल्या जातात. नदीपात्रामध्ये पाण्याच्या प्रवाहास आडव्या अशा रीतीने सांधेमोड पद्धतीने पिशव्या रचल्या जातात.
वनराई बंधाऱ्याच्या बांधणीसाठी जागेची निवड हा महत्त्वाचा भाग आहे. प्रथम नालापात्राची पाहणी करून कमीत कमी खर्चात जास्तीत जास्त जलसाठा करणे शक्य होईल, अशी जागा निवडावी. नाला पात्र अरुंद व खोल असावे, जेणेकरून साठवणक्षमता पुरेशी होईल. नालापात्राचा उतार तीन टक्क्यांपेक्षा जास्त नसावा. नालापात्रास स्पष्ट काठ असणे जरुरीचे आहे. वनराई बंधाऱ्यासाठी निवडलेली जागा वळणालगतची असू नये.
संपर्क - 02358- 280558
कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र,
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ, दापोली
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
येत्या काळात गाव स्तरावर पावसाच्या पाण्याचे व्यवस्...
नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी व दुर्गम भागातील शेतक...
बंधाऱ्यासाठी वापरत असलेले सिमेंट चांगले असावे. सहा...
पाणलोट क्षेत्र विकास करण्याकरिता पाणलोट क्षेत्राती...