शेतकरी बंधुनो, आजच्या आधुनिक शेती पध्दतीत पूर्वमशागतीसाठी सृधारित अवजारे, उन्नत व अधिक उत्पादन देणा-या जातींचा वापर रोगनाशके कोड़नाशके, आंतरमशागत, रासायनिक खताचा वापर इत्यादी गोष्टींचा अंतर्भाव केला जातो. यापैकी प्रामुख्याने रासायनिक खतांचा वापर केल्याने पीक उत्पादनात भरीव वाढ झाली. परंतू मागील दोन तीन वर्षात पीक उत्पादनात फारशी वाढ झाली नाही. त्याचे महत्वाचे कारण म्हणजे रासायनेिक खतांचा अमर्याद व असमतोल वापराने जर्मनीची सुपिकता आणि उत्पादकता कमी झाली आहे.
सेंद्रिय कर्ब हा जमिनीचा महत्वाचा गुणधर्म आहे. महाराष्ट्रातील जमिनीमध्ये १ टक्केपेक्षा सेंद्रियकर्वाची पातळी राखणे आवश्यक आहे. परंतू हे प्रमाण हळूह्ळू कमी होत आहे. त्यामुळे जमिनीची सुपिकता कमी झाल्याने पीक उत्पादनक्षमता कमी होते. आणि त्याचा अनिष्ट परिणाम होवून शेतक-यांचे अप्रत्यक्षरित्या अधिक नुकसान होते.
जमिनीची उत्पादकता आणि सुपिकता टिकविण्यासाठी प्रामुख्याने जमिनीच्या प्रकारानुसार पीक व्यवस्थापन, जमिनीची योग्य वेळी पूर्वमशागत, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन त्यामध्ये माती परिक्षणानुसार रासायनिक खतांचा समतोल वापर, सुक्ष्म अन्नद्रव्ये, सेंद्रिय खते व जीवाणू खतांचा वापर करावा.
जर्मनीची उत्पादकता व सुपिकता टिकविण्यासाठी सेंद्रिय खतांचे महत्व अनन्यसाधारण आहे. कारण या खतांमुळे जर्मनीची भौतिक, रासायनिक आणि जैविक गुणधर्मात चांगली वाढ होते, भौतिक गुणधर्मात प्रामुख्याने बदल होतो, त्यामध्ये जमिनीची जडणघडण योग्य होते, निचरा योग्य व हवा खेळती राहते, जमिनीची धुप कमी होवून जलधारणशक्ती वाढते. सेंद्रिय खतांमध्ये शेणखत, कंपोस्ट, खाद्यअखाद्य पेंढी, गांडूळ खत इत्यादीचा समावेश होतो.
मात्र सेंद्रिय खते पिकांना जास्त प्रमाणात लागतात. परंतू आपण त्याप्रमाणात देवू शकत नाही. कारण या खतांचा तुटवडा जाणवत आहे. अशा परिस्थितीत जमिनीचा पोत, कस, सुपिकता टिकविण्यासाठी हिरवळीच्या खतांचा वापर करणे काळाची गरज आहू. हिरवळीचे खत हे इतर शेणखत व कंपोस्टखत यांना पर्याय ठरु शकत नाही. आजच्या काळामध्ये सेंद्रिय खतांच्या किंमती व रासायनिक खतांच्या किंमती वाढलेल्या आहेत. खतावरील खर्च कमी करण्यासाठी हिरवळीच्या खतांची मदत होते.
हिरवळीचे खत जर्मनीमध्ये वनस्पतींची हिरवी पाने किंवा जमिनीमध्ये हिरवी पिके वाढवून पीक फुलो-यात असतांना त्याच जमिनीमध्ये नांगरणीच्या सहाय्याने गाडतात. या पध्दतीस हिरवळीचे खत असे म्हणतात. हिरवळीच्या खतांचे प्रकार
ताग, धैचा, मूग, गवार, चवळी, उडीद, बरशीम या पिकांची निवड केली जाते.ही पिके जमिनीत मुख्यपिक किंवा आंतरपिक म्हणून लावतात. आणि पीक फुलावर येण्याअगोदर जमिनीमध्ये गाडतात. हिरवळीच्या पिकासाठी व्दिदल पिकांची निवड करावी. कारण त्यांच्या मुळांवर गाठी असतात. या गाठीतील जीवाणू हवेतील नत्र स्थिर करून ठेवतात. ही पिके कमी पाण्यावर येणारी असावीत आणि त्याची मुळे खोल जाणारी असावीत. हिरवळीच्या खताच्या पिकापासून जास्तितजास्त हिरवी पाने मिळतील आणि त्या पिकाचे अवशेष जमिनीमध्ये लवकरात लवकर कुजणारे असावेत. त्यामुळे सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण वाढते. अशा परिस्थितीत जमिनीची सुपिकता वाढण्यास मदत होते.
यामध्ये लेिरिसिडिया, शेवरी, जंगली धैचा, करंज, सुबाभूळ इत्यादी झुडुपे आणि झाडांचा समावेश असून या झुडुपांची आणि झाडांची हिरवी पाने, फांद्या (कुजण्यासाठी योग्य असणारी) जमिनीत पसरून नांगरणीच्या
पिकाचे नाव | हंगाम | सरासरी हिरवळीच्या खताचे उत्पादन (क्विंटल / हेक्टर) | नत्र टक्के (हिरवे वजनावर) | जमिनीमध्ये मिळणारे नत्र ( किलो/हेक्टरी) |
---|---|---|---|---|
ताग | खरीप/उन्हाळी | १५२ | ०.४३ | ८४.० |
धैचा | खरीप/उन्हाळी | १४४ | ०.४२ | ७७.१ |
मुग | खरीप/उन्हाळी | ५७ | ०.५३ | ३८.६ |
चवळी | खरीप | १०८ | ०.४९ | ५६.३ |
गवार | खरीप | १४४ | ०.३४ | ६२.३ |
सेन्जी | रब्बी | २०६ | ०.५१ | १३४.४ |
खेसरी | रब्बी | ८८ | ०.५४ | ६१.४ |
बरशीम | रब्बी | १११ | ०.४३ | ६०.७ |
वेळी गाडतात. ही झाडे आणि झुडुपे शेताच्या बांधावर आणि पडिक जमिनीत लावून हिरवळीच्या खतासाठी वापर करावा.
शेतकरी बंधुनो आजच्या परिस्थितीमध्ये जमिनीचा कस , जमिनीचे आरोग्य टिकविण्यासाठी तसेच खतावरील खर्च कमी करण्यासाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनामध्ये हिरवळीच्या पिकांचा खतासाठी वापर करून अधिकाधिक दर्जेदार उत्पादन घ्यावे.
स्त्रोत - कृषी विभाग महाराष्ट्र शासन
अंतिम सुधारित : 10/7/2020
ऊस पिकाच्या उगवण, फुटवे, कांडी सुटणे आणि जोमदार वा...
ऊस पिकामध्ये शेतकरी अधिक उत्पादन मिळवण्यासाठी नत्र...
वॉटरशेड ऑर्गनायझेशन टृस्ट प्रस्तुत कंपोस्ट खत हि ...
ऊसतोडणी झाल्यानंतर पाचट जाळून न टाकता तो एक आड एक ...