- लहान कोंबडी पिल्लांचे थंडीच्या काळात योग्य व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. लहान पिल्लांना थंडीपासून वाचविण्यासाठी गॅस ब्रुडर, बांबूचे ब्रुडर, शेगडी इत्यादींचा वापर करावा.
- पिलांच्या घरात थंडीच्या काळात कमीत कमी दोन तास तरी ऊन येईल, अशी व्यवस्था असावी.
- थंडीच्या काळात कोंबडी शेड गरम राहणे अत्यंत आवश्यक असते. यासाठी शेडला पोत्यांचे पडदे लावावेत. शक्य असल्यास छतावरदेखील पोत्यांचे आच्छादन करावे. पोते जाड असावे. याद्वारा पहाटेची थंड हवा, गारवा कोंबड्यांच्या शेडमध्ये येण्यापासून बचाव होईल.
- रात्री कोंबड्यांच्या घराच्या जाळीचा जवळपास दोन फूट खालचा भाग पडद्याने झाकून घ्यावा.
- शेडमध्ये कोंबड्यांची संख्या पूर्ण असावी. कमी कोंबड्या असतील तर थंडी जास्त प्रमाणात जाणवेल.
- कोंबड्यांच्या शेडमध्ये विद्युत दिवे (बल्ब) लावावेत. त्यामुळे शेडमध्ये ऊब राहते.
- विद्युतपुरवठा नसेल तर शेगडी किंवा स्टोव्हचा वापर करावा. मात्र शेगडीने धूर होणार नाही याची काळजी घ्यावी.
- उबदारपणामुळे कोंबड्या आरामात राहतात, शिवाय शेडमधील वातावरण कोरडे राहते.
- कोंबड्यांच्या शेडमध्ये असलेले जुने पडदे, पोते, जमिनीवरचे आच्छादन, जुने खाद्य इत्यादी काढून टाकावे. जुने पडदे, पोते जाळून टाकावे.
- शेडमधल्या जमिनीवर नवीन लिटर टाकावे. जाड पोत्याचे पडदे लावावेत.
- शेडमधील कोळिष्टके, जाळे इत्यादी काढून स्वच्छ करावेत.
- कोंबड्यांच्या शेडच्या सभोवतालचे गवत, झुडपे व इतर तण काढून टाकावेत. मात्र शेडच्या सभोवताली मोठी झाडे असावीत.
- धान्य/आहार साठविण्याच्या गोदामाची साफसफाई करून घ्यावी.
- हिवाळा हा आरोग्यदायक ऋतू आहे. हिवाळ्यात कोंबड्यादेखील जास्त प्रमाणात आहार घेतात.
- जर आपल्या कोंबड्या या कमी आहार घेत असतील तर याचा अर्थ त्या आजारी असू शकतात. त्यामुळे त्यांचे निरीक्षण करून पशुवैद्यकाकडून योग्य ते औषधोपचार करावेत.
- कोंबड्यांचे खाद्याचे भांडे नेहमी भरलेले असावे.
- हिवाळ्यात कोंबड्यांना पाणी मात्र कमी प्रमाणात लागते. याचे प्रमुख कारण म्हणजे वातावरणात गारवा असल्यामुळे पाणीदेखील थंड राहते. याकरिता कोंबड्यांना गरजेइतके पाणी द्यावे.
स्त्रोत: अग्रोवन
अंतिम सुधारित : 10/7/2020
0 रेटिंग्स आणि 0 टिप्पण्या
तार्यांवर रोल करा, नंतर दर क्लिक करा.
© C–DAC.All content appearing on the vikaspedia portal is through collaborative effort of vikaspedia and its partners.We encourage you to use and share the content in a respectful and fair manner. Please leave all source links intact and adhere to applicable copyright and intellectual property guidelines and laws.