सध्याचे युग संगणकाचे युग आहे. संगणकामुळे सर्वच क्षेत्रांत क्रांती झाली आहे. कृषी व्यवसायात संगणकामध्ये असणाऱ्या संकेतस्थळांचा वापर केला तर कृषी माहितीचा प्रस्फोटक खजिना आपल्या हाती नक्कीच लागतो. कृषी विद्यापीठ, कृषी संशोधन संस्था, कृषी खाते आणि इतर कृषी क्षेत्रातल्या खासगी अगर सहकारी संस्थांचे कृषी संशोधन आणि इतर उपयुक्त माहितीचा स्त्रोत त्यांच्या संकेतस्थळांवर उपलब्ध आहेत.
संकेतस्थळावर बियाणे, खते, वेगवेगळ्या कृषी निविष्टा, हवामान – पाऊस, पिकाची आकडेवारी, पिकांची लागवड वेगवेगळ्या उत्पादकांची यादी विक्री केंद्रे आयात – निर्यातीची सखोल माहिती. जैवविविधधता, जैवअभियांत्रिकि, बिजोत्पादन, टिश्यू कल्चर, बायो – टेक्नोलॉजी. परदेशातल्या शेती व्यवसायाची यशोगाथा अशी किती तरी माहिती संकेतस्थळावर क्लिक केले कि उपलब्ध होते.
माहिती तंत्रज्ञानाच्या कृषी खात्याने संगणकामार्फत ई – गव्हर्नन्सला प्राधान्य दिले आहे. कृषी तंत्रज्ञान, कृषी योजना, कृषिविषयक सल्ला दिला जातो. त्याचप्रमाणे इंटरनेटची सुविधा खेड्यापाड्यात सर्वत्र उपलब्ध झाली आहे.
या सुविधांचा उपयोग शेतकरीही मोठ्या प्रमाणात करू लागले आहेत. प्रगतीशील शेतकरी, हरितगृहात कृषी उत्पादने घेणारे शेतकरी, फुल उत्पादक, धान्य – भाजीपाला उत्पादक शेतकरी संगणकाचा वापर करू लागले आहेत. आपल्या शेतीचा जमा – खर्च, महत्वाच्या नोंदी, पिकांच्या लागवडी इ. साठी संगणकाचा वापर करू लागला. काहींची तर पूर्णतः कॉम्प्यूटराज्ड शेती आहे.
सध्या मोबाईल आणि संगणकाचा मोठ्या प्रमाणात प्रसार झाला आहे. याचा फायदा करून घेण्यासाठी महाराष्ट्राच्या कृषी खात्याने सीयुजी (क्लोज युजर ग्रुप) सेवा उपलब्ध केली आहे. या सीयुजी सेवेने एसएमएसद्वारे अगर प्रत्यक्ष मोबाईल फोनद्वारे कृषिविषयक सल्ला दिलं जातोय. कृषी विस्ताराचे काम अतिवेगाने अतिजलदरित्या होऊ लागले आहे आणि तेही अतिशय कमी फोन बिलात एकमेकांशी संपर्क साधता येऊ लागला आहे. सध्या मोबाईलद्वारे सीयुजी ग्रुपमार्फत कृषी खात्यांत चैतन्य येऊन कृषी विस्ताराचे कार्य अतिशय प्रभावीपणे चालले आहे. एकंदरीत कृषी व्यवसायात संगणकाने अमुलाग्र बदल घडवून आणला आहे. जागतिक बाजारपेठेत भारतीय कृषी उत्पादनाला बाजारपेठेत मिळवून देण्यासाठी तसेच देशाला अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण करण्यासाठी इतर अनेक गोष्टींप्रमाणेच संगणकाचे योगदान फार मोठे राहणार आहे.
एखाद्या घटकाचे ठराविक अंतरावरून त्याच्याजवळ न जाताअगर आपल्या दृष्टीच्या पलीकडे जाऊन संगणकाद्वारे निरीक्षण करू शकतो. माहिती गोळा करू शकतो. या तंत्रज्ञानामुळे त्या घटकाचे फोटोग्राम घेऊन त्याची एक विशिष्ट मालिका तयार करू शकतो. यालाच रिमोट सेन्सिंग अगर दूरक्षेत्र नियंत्रण म्हणतात. याचे उदाहरणच घ्यायचे झाल्यास विविध किडीरोग यांचा पिकावरील हल्ला आपल्या दृष्टीपथात येण्याच्या अगोदरच पूर्वकल्पना म्हणून रिमोट सेन्सिंगच्या सहाय्याने उघड करण्यात येतो आणि याचं गोष्टीला शेती व्यावसायात खूप मोठे महत्व आहे. नेहमीच पारंपारिक जीआयएस तंत्रज्ञान वापरून जी माहिती गोळा करता येत नाही. अशी माहिती रिमोट सेन्सिंगद्वारे सहजपणे मिळवता येते. म्हणूनच या दूरक्षेत्र नियंत्रणाला अचूक शेती तंत्रज्ञान माहितीच्या संकलनामध्ये आणि त्याचे विश्लेषण करून योग्य घेण्याच्या प्रक्रियेत अनन्यसाधारण महत्व आहे.
सेन्सार हे एक उपकरण आहे. अनेक प्रकारची सेन्सार्स उपग्रहावर, विमानावर अगर हेलिकॉप्टरवर ठेवली जातात. तिथूनच ही सेन्सार पृथ्वी भूतलावरची अगर वातावरणातील विद्युत चुंबकीय लहरींमार्फात घडणाऱ्या घटकांची माहिती आणि फोटोग्राफ घेतात.
या संकलन केलेल्या माहितीच्या पृथःकरण करतात. विश्लेषणही करतात आणि मग आपल्याला उपयुक्त माहितीच्या स्वरुपात देतात.
रिमोट सेन्सिंगचे अनेक फायदे आहेत. या तंत्रज्ञानाद्वारे फार मोठ्या प्रमाणात माहिती संकलित केली जाते. कायमस्वरूपी त्या माहितीची साठवण केली जाते. माहिती आलेखाच्या स्वरुपात अतिशय कमी खर्चात विश्लेषित केली जाते. आपल्या दृष्टीक्षेपापलिकडची अचूक आणि योग्य वेळी माहिती गोळा केली जाते. विविध रंगाचे फोटो (प्रतिमा) त्रिमितीमध्ये उपलब्ध होतात. या तंत्रज्ञानामुळे अनेक पिकांची ओळख, एकूण पिकाखालचे क्षेत्र, वाढीची अवस्था, वाढीचा दर, उत्पादनाचा अंदाज, प्रत्यक्ष उत्पादन, जमिनीची सुपीकता, पोत, सामू, ओलावा, पाण्याची प्रत, किडीरोगाचा प्रादुर्भाव आणि त्याचे प्रमाण इ. गोष्टींचे सर्वेक्षण केले जाते.
रिमोट सेन्सिंगमुळे गायींची संख्या, मेंढ्यांची संख्या, डुकरांची, कोंबड्यांची संख्या, वय आणि लिंगानुसार वर्गीकरण, प्राण्यांचे रोग, स्वभाव, निवारा इ. गोष्टीचे निरीक्षण केले जाते. अशा प्रकारे प्रत्येक विषयातले सर्वेक्षण केले जाते. अर्थात काही त्रुटीही असतात.
कृषी क्षेत्रात पीक आराखडे, हवामान, अंदाज, जमिनीचे पशुधनाचे सर्वेक्षण इ. अनेक बाबींमध्ये क्रांती घडून आली आहे. अंतराळात या शास्त्राने घेतलेली ही एक मोठी गरुडझेप आहे. रिमोट सेन्सारला शेती व्यवसायात मोठे महत्व येऊ लागले आहे.
कृषी प्रवचने - प्रल्हाद यादव
अंतिम सुधारित : 6/6/2020
आपल्या पीसी उर्फ संगणकातून अथवा लॅपटॉपमधून निघणारे...
या २१व्या शतकात आपल्याला जर आपली शिक्षण पद्धती आधु...
प्रगतिशील शेतकरी कुलदीप राजाराम राऊत यांनी विदर्भा...
पुण्यातील एका मध्यमवर्गीय कुटुंबात श्री. श्रीकांत ...