कृषी व पूरक उद्योगांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील सुशिक्षित बेरोजगारांना उद्योग उभारणीसाठी विशेष प्रोत्साहन देण्यासाठी नाशिक येथील ह्युमन सर्व्हिस फाउंडेशन यांच्या वतीने ‘संडे स्कुल ऑफ ऍग्रो इंटरप्रेनरशिप' हि संकल्पना सुरु करण्यात आली आहे .याकरिता संस्थेचे अध्यक्ष संजय न्याहरकर यांनी पुढाकार घेतला आहे. या माध्यमातून प्रत्येक महिन्यांच्या दर दुसऱ्या व चौथ्या रविवारी कृषी व कृषी संबंधित शेळीपालन, दुग्धव्यवसाय, मधुमक्षिकापालन, मत्स्यपालन, कुक्कुटपालन, कृषीपर्यटन, नर्सरी, पॉलीहाऊस/शेडनेटशेती, बेकरी, लँडस्केपिंग, शेतकरी उत्पादक कंपनी, ऍपल बोर लागवड, ड्रॅगन फळ लागवड, अंजीर लागवड, सेंद्रिय शेती यांसह विविध व्यावसायिक विषयांवर मार्गदर्शन केले जाते.नाशिक, ठाणे,अहमदनगर, जळगाव, धुळे, पुणे या जिल्ह्यातील युवकांनी या कार्यशाळेत सहभाग नोंदविला आहे. 'ना नफा-ना तोटा' असे या कार्यशाळेचे स्वरूप आहे. अत्यल्प दरात भोजन व्यवस्थेसह संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञ मार्गदर्शकांच्या उपस्थित कार्यशाळेचे आयोजन केले जाते.
भारतातील युवा बहुसंख्य ग्रामीण भागात राहतात आणि त्यांना सर्वात जगण्यासाठी शेती व संबंधित कामांवर अवलंबून असतात. युवकांनी नोकरीच्या मागे न लागता स्वतःमधील उद्यमशीलता वाढवून उद्योजक बनून रोजगारनिर्मिती साठी हा प्रयत्न आहे.कृषी उत्पादनावर आधारित प्रक्रिया उद्योग सुरू करून ग्रामीण भागात रोजगार निर्मितीच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शेतकऱ्यांच्या मुलांनी पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे.त्यासाठी या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत कार्यशाळेचे आयोजन मीडिया हाऊस, आनंदीनगर, गंगापूर रोड, नाशिक (संपर्क मोबाईल नं:- ७७७४०४७४७१) येथे करण्यात येते.आजपर्यंत शेळीपालन, कुक्कुटपालन, मत्स्यशेती, हायड्रोपोनिक चार निर्मिती या विषयावर कार्यशाळा संपन्न झाली आहे.
शेतीच्या माध्यमातून सर्वाधिक रोजगारनिर्मिती होत असल्यामुळे या उद्योगाच्या विकासासाठी विशेष आवश्यकता आहे. महाराष्ट्रातील बेरोजगार युवकांना कौशल्य विकास व उद्योजकतेद्वारे स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासोबतच कुशल मनुष्यबळ निर्मितीसाठी विशेष कार्यक्रम याअंतर्गत राबविण्यात येतात .या माध्यमातून कृषी क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्या युवकांना प्रोत्साहनही देण्यात येते . त्यासाठी कौशल्यावर आधारित कृषी व कृषिपूरक व्यवसायाचे प्रशिक्षण आणि मार्गदर्शनाच्या स्वयंरोजगार निर्मितीसाठी योग्य ते सहकार्य या माध्यमातून केले जाते.
लेखन - मुकुंद पिंगळे, कोपरगाव
अंतिम सुधारित : 10/7/2020
नगर जिल्ह्यातील बलभीम पठारे यांना पारंपरिक पीक पद्...
पुणे येथील राजलक्ष्मी भोसले यांनी आपल्या 35 गुंठे ...
मनीषा व देवनाथ जाधव या दांपत्याने तुती लागवड आणि र...
प्रगतिशील शेतकरी कुलदीप राजाराम राऊत यांनी विदर्भा...