“समृद्धीच्या वाटेवर” या माहितीपटात हिवरे आणि चिमठावळ या दोन गावात वॉटर संस्थेने पाणलोटक्षेत्र विकासाची कामे राबविल्यानंतर गावकर्यांच्या राहणीमानात झालेल्या बदलाची माहिती दिली आहे.
या माहितीपटाद्वारे क्षमता बांधणी आणि अंमलबजावणी या दोन टप्प्यात पाणलोट विकासाची प्रक्रिया स्पष्ट केली आहे. यामध्ये नापीक असेलेली जमीन कशाप्रकारे सुपीक होऊन त्यामध्ये वर्षाला दोन पिकेपर्यंत उत्पादन घेता येऊ शकते या हे दाखवून दिले आहे. पाणलोट विकासाबरोबरच महिला सक्षमिकरण ज्यामध्ये बचत गट स्थापना आणि आरोग्य काळजी यांच्या प्रगतीची माहिती दिली आहे. श्रमदानाचे महत्व नमूद केले आहे
या दोन्ही हिवरे आणि चिमठावळ गावात स्थलांतरीत झालेली कुटुंबे पाणलोट क्षेत्र विकासाची कामे झाल्यामुळे परत आल्याचा अनुभव आहे आणि गावात उद्यमशीलता देखील वाढली आहे.स्त्रोत - वाॅटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट
अंतिम सुधारित : 10/7/2020