उस्मानाबाद जिल्ह्यातील सक्करवाडी गाव. गावात पाण्याचा त्रास होताच. त्यात गावातले लोक म्हणावे तेवढे सक्रिय नव्हते. गावातलं शिक्षक जोडपं अमोल आणि विशाखा अंधारे हे गावात बदल घडवून आणण्यासाठी सतत प्रयत्नशील होते. आणि त्यातच वाॅटर कप २०१७ ची घोषणा झाली. गाव या स्पर्धेत सहभागी झालं. आणि जलसंधारणाची कामं जोरात सुरु झाली. गावाला विकास हवा होता, फक्त त्या विकासाचा मार्ग अमोल सरांनी दाखवला. गाव जादू झाल्याप्रमाणे एक झालं.
कालावधी - 4.41 मिनिट
स्त्रोत - पाणी फौंडेशन
अंतिम सुधारित : 10/7/2020
स्त्री! एका चौकटीत बंदिस्त... चौकट परंपरांची, चौकट...
या माहितीपटात श्रमदानाचे महत्व दिले आहे व श्रमदान...
गावकरयांनी श्रमदानाच्या माध्यमातून लोकांना एकत्र घ...
औरंगाबाद जिल्ह्यातील गोळेगावात स्पर्धेबरोबरच श्रमा...