सर्वांगीण पाणलोट क्षेत्र विकासामुळे गावाचा चेहरामोहराच पालटतो .नैसर्गिक साधन संपत्तीची पुनर्निर्मिती करण्याबरोबरच पाणलोट क्षेत्रातील ग्रामस्थांना एकत्र करून त्यांच्यात चेतना निर्माण होते .
अशा ग्रामस्थांमध्ये जे स्वतःचा विकास करण्याच्या उद्देशाने बहुदा प्रथमच एकत्र आले असतील .
सलग तीन वर्षे दुष्काळाचे चटके सोसूनही वैजू बाभूळगाव (ता.पाथर्डी,जी.अहमदनगर )या गावाला प्यायला आणि जनावरांसाठी पुरेसे पाणी उपलब्ध होते .हि कथा आहे गावकरयांच्या शब्दात .त्यातून आपल्याला समजते विकासाची प्रक्रिया ,पाणलोट क्षेत्र विकासाबद्ल धारणा आणि त्यांच्या आयुष्यात घडलेले परिवर्तन
पाणलोट क्षेत्रात नव्यान काम सुरु करून आपल्याला क्षेत्रामध्ये विकास घडवू इच्छिणारयांसाठी हि ध्वनी चित्रफीत एक उपयुक्त साधन आहे .जाणीव जागृती करिता आणि प्रशिक्षणाकरिता उपयोग होईल .
स्त्रोत -वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट
अंतिम सुधारित : 10/7/2020