गरिबी ,दुष्काळ,कर्ज,स्थलांतर –आपल्या देशाच्या सगळ्या गावांची हीच कहाणी आहे. जेव्हा महिला ह्या परिस्थितीला बदलायचं ठरवतात तेव्हा काय घडू शकत ते हि फिल्म दाखवते.ह्याची सुरुवात होते जेव्हा गावातल्या महिला एक छोटा निर्णय घेतात .- घराबाहेर निघायचा आणि स्वयंसाहाय्य गट बनवायचा. गटाच्या निमित्ताने महिला एकत्र येतात, काही नवीन शिकतात, चार सुखदुखाच्या गोष्टी करतात,एकमेकीचा आधार बनतात आणि स्वावलंबनाच्या वाटेवर प्रवास सुरु करतात.
ह्या मार्गावर पहिली पायरी आहे सावकारांच्या कचाट्यातून सुटणे आणि स्वतःसाठी बचत आणि कर्जाचा एक पर्याय उभा करणे. ह्या प्रक्रियेत महिला त्यांच्या जीवनाचे प्रश्न सोडवायला शिकतात आणि त्यांना कळतं कि त्यांचे प्रश्न गावाच्या विकासाशी सलग्न आहेत .त्यांना संगठनेचा महिमा जाणवतो .त्यातून एक सशक्त संयुक्त महिला समिती उभी होते-अनेक गटांचा एक मंच .अशी सशक्त संयुक्त महिला समितीची महिलांची भीती कमी करते आणि समाजातल्या असमानतेला प्रत्युतर देण्याचे धाडस देते .स्वावलंबनाच्या दिशेने ह्या महिलांनी खूपच प्रगती केली आहे .संपूर्ण स्वावलंबनाच्या वाटेवर त्यांना अजूनही लांबचा पल्ला गाठायचा आहे .ह्या प्रवासात वाँटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट , वाँटर संस्थेनी महिलांना सतत पाठींबा दिला आहे .
स्त्रोत वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट
अंतिम सुधारित : 10/7/2020